- शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे नाव आणले रेसमध्ये
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारची वर्षपूर्ती साजरी करून आपले आसन स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत धनंजय मुंडे यांचे नाव आणले आहे. Sharad pawar news
“लोकमत”ला दिलेल्या खास मुलाखतीत पवारांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय भवितव्याविषयी अनेक महत्त्वाची विधाने केली आहेत. Sharad pawar news
सुप्रिया सुळे यांचे नाव महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुमच्या मनात आहे काय?, या प्रश्नावर उत्तर देताना पवारांनी थेट “नाही” असे न म्हणता सविस्तर उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. राज्याच्या राजकारणात नेतृत्व करण्यासाठी तरुणांची फळी आहे. त्यात अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारखे नेते आहेत, असे पवार म्हणाले.
पण त्याचबरोबर पवारांनी यात प्रथमच धनंजय मुंडे यांचेही नाव जोडले आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे आपले आसन स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आधीच आणण्यात आले आहे. अशा स्थितीत पवारांनी धनंजय मुंडे यांच्या रुपाने मागच्या पिढीतील नेत्यांपेक्षा तरुण असे नाव रेसमध्ये कसे आणून ठेवले?, याची चर्चा सुरू झाली आहे.
Sharad pawar news
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यापेक्षा धनंजय मुंडे हे तरुण आणि पुढच्या पिढीतले आहेत. त्यांचे नाव पवारांनी रेसमध्ये आणून अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षांना एक प्रकारे लगाम तर घातला नाही ना? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. की त्यांचे नाव उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यामधील “स्टॉप गॅप अरेंजमेंट” म्हणून घेतले आहे? याविषयी देखील चर्चा रंगत आहेत.
काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने असल्याची सुप्त चर्चा सुरू आहे. त्यांच्यापुढे नेतृत्वाचे गाजर दाखवून त्या चर्चेला लगाम जाण्याचाही पवारांचा विचार नाही ना? अशी चर्चाही सुप्तपणे सुरू झाली आहे.