• Download App
    शरद पवार,अजित पवार यांनी जनतेला लुटलेय आरोप चुकीचे तर सिद्ध कराच : सोमय्याSharad Pawar, Ajit Pawar has robbed the people; kirit somyya

    शरद पवार,अजित पवार यांनी जनतेला लुटलेय आरोप चुकीचे तर सिद्ध कराच – सोमय्या

    वृत्तसंस्था

    सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नातेवाईकांवर केलेले आरोप चुकीचे असतील तर त्यांनी सिद्ध करावेत, असे चॅलेंज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियांना दिले आहे.  ते म्हणाले, अजित पवारांनी बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली..?  Sharad Pawar, Ajit Pawar has robbed the people; kirit somyya

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून १८४ कोटींचे बेनामी व्यवहार इडीच्या छाप्यात सापडले आहेत. शिवाजी व्हेन्चर प्रायवेट लिमिटेड, इंडो प्रायवेट लिमिटेड कोणाची आहे? या दोन्ही कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी १०० कोटी दिले होते.  संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला तसा अजित पवार परत करणार आहेत का ?, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला.

    अजित पवारांच्या भगिनी नीता पाटील, विणा पाटील आणि मेहुणे मोहन पाटील यांचा जरंडेश्वर साखर कारखान्यापासून विविध कंपन्यात पार्टनरशीप आहे. त्यामुळे अजित पवारांनी आपल्या बहिणींशी बेईमानी केली. महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली याच उत्तर अजित पवारांनी द्यावे.

    दरम्यान, अजित पवारांवर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे सोमय्या इडी आणि इनकम टॅक्सला पाठवणार आहे, असे सांगताना ते म्हणाले, हे पुरावे खोटं असल्याच शरद पवारांनी सिद्ध करावे, हे चॅलेंज ही सोमय्यांनी पवारांना दिले आहे.
    शरद पवार, अजित पवार, रोहित पवार,पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी आरोप खोटं असल्याच सिद्ध करावं. पवार फॅमिली जनतेला लुटण्याचं काम करत आहे. त्यांना उघडे पडण्याच काम मी करतोय, असे ही विधान सोमय्यांनी केलं आहे.

    – आरोप चुकीचे तर, मग, सिद्ध कराच

    – किरिट सोमय्या यांचे पवारांना आवाहन

    – परिवाराकडून १८४ कोटींचे बेनामी व्यवहार

    – बेनामी व्यवहार इडीच्या छाप्यात उघड झाले आहेत

    – अजित पवारांचे पुरावे इडी, इनकम टॅक्सला देणार

    – संपूर्ण पवार फॅमिलीने जनतेला लुटले आहे

    -शरद पवार, अजित पवार, रोहित पवार,पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांना उत्तर देण्याचे आव्हान

    Sharad Pawar, Ajit Pawar has robbed the people; kirit somyya

     

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!