प्रतिनिधी
पणजी – गोव्यात दोन मुलींवर बलात्कार झाला. संबंधित घटना २४ जुलै रोजी घडली. गोव्याच्या बेनालिम समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला तर त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांना जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी सरकारी कर्मचारी आहे. Shame on DrPramodPSawant for insinuating that the recent r*pe case took place because parents let their children party out at night.
आसिफ हटेली (२१ वर्ष), राजेश माने (३३ वर्ष), गजानन चिंचकर (३१ वर्ष) आण नितीन यब्बल (१९ वर्ष) अशी या आरोपींची नाव आहेत.
मात्र आज चार दिवसांनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. बलात्काराच्या घटनांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणालेत, की तरुण मुलांच्या आई-वडिलांनी आपली मुलं रात्री कुठे जात आहेत याकडे लक्ष द्यायला हवे. या घटनेत १० तरुण समुद्रकिनारी पार्टीसाठी गेले होते. यातील सहा जण घरी परतले मात्र चौघे जण तिथंच थांबले होते. यात दोन मुले आणि दोन मुली होत्या. अल्पवयीन मुलांचे अशा पद्धतीने रात्रभर घराबाहेर राहणे योग्य नाही, असेही प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
डॉ. प्रमोद सावंतांचे विधानसभेतले हे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. एक १४ वर्षांची मुलगी संपूर्ण रात्रभर समुद्रकिनारी भटकत असेल तर आई-वडिलांना आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. केवळ मुले त्यांचे ऐकत नाहीत म्हणून आपण केवळ सरकार आणि पोलिसांवर ही जबाबदारी टाकू शकत नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भर विधानसभेत केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
बलात्कार करणाऱ्यांना रोखा. पार्टी करणाऱ्या मुलींचा यात काय दोष, असे सवाल नेटकऱ्यांनी यानिमित्ताने प्रमोद सावंतांना विचारले आहेत. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्द्यावरून गोव्यातील कायदा आणि सुवव्यवस्थेवरून सावंत सरकारला धारेवर धरले. मात्र, सोशल मीडियात सावंतांच्या वक्तव्यावरून दोन तट पडल्याचे दिसत आहे. अनेकांनी चारही आरोपींना अटक झाल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. तसेच मुलांकडे पालकांनी लक्ष द्यावे या वक्तव्यात चूक काय, अशी परखड विचारणा देखील अनेक नेटकऱ्यांनी केली आहे.
Shame on DrPramodPSawant for insinuating that the recent r*pe case took place because parents let their children party out at night.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सेबीने ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड, नियमांचे केले उल्लंघन
- घराणेशाही वाचविण्यासाठीच कॉँग्रेस, शिवसेनेसेह विरोधी पक्ष एकत्र, संबित पात्रा यांचा आरोप
- सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जलवा, ट्विटर अकाऊंट सात कोटी फॉलोअर्स
- टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग
- बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार