पंजाब मधल्या २००० कोटींच्या खाण घोटाळ्यात राणा गुरुजित सिंग यांचे नाव आले आहे त्यांना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी२०१८ मध्ये मंत्रिमंडळातून वगळले होते. परंतु आता मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांचे नाव आहे.Seven Congress MLAs revolt in Punjab before cabinet expansion; Opposed to make a MLA a minister in a Rs २००० crore mining scam
वृत्तसंस्था
चंडीगढ : पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी शपथ घेऊन चार दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज मुहूर्त मिळाला, पण हा विस्तार प्रत्यक्षात होण्यापूर्वीच काँग्रेसच्या सात आमदारांनी प्रस्तावित मंत्र्याच्या खाण घोटाळ्याचा उल्लेख करत त्यांनी त्याला मंत्रिमंडळात सामील करून घेण्यास विरोध दाखविला आहे.
पंजाब मधल्या २००० कोटींच्या खाण घोटाळ्यात राणा गुरुजित सिंग यांचे नाव आले आहे त्यांना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी २००० मध्ये मंत्रिमंडळातून वगळले होते. परंतु आता मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांचे नाव आहे.
या नावाला काँग्रेसच्या सात आमदारांनी विरोध केला आहे तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना न पाठवता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना पाठविले आहे हाही एक प्रकारचा काँग्रेसच्या आमदारांनी अधिक्षेप केला आहे.
कारण मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हा अधिकार सर्वस्वी घटनात्मक दृष्ट्या मुख्यमंत्र्यांचा असतो परंतु मंत्रिमंडळात राणा गुरूजित सिंग यांना घेण्यात येऊ नये, असे पत्र सात आमदारांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पाठवून त्याची सी. सी. मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे हाच नेमका मुख्यमंत्र्यांचा घटनात्मक आणि राजकीय अस अधिक्षेप आहे.
Seven Congress MLAs revolt in Punjab before cabinet expansion; Opposed to make a MLA a minister in a Rs 2,000 crore mining scam
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप आमदारांनी केली पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ! रुपाली चाकणकर म्हणाल्या, त्या आमदारांनी जाहीरपणे माफी मागावी
- या कारणासाठी सोमय्यांना कोल्हापुरात येण्यास बंदी घातली होती! सतेज पाटील यांनी व्यक्त केले मत
- अमेरिकेतून परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत भव्य स्वागत
- बिहारच्या मोतीहारीमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 22 जणांना जलसमाधी, आतापर्यंत 6 मृतदेह हाती, शोधमोहीम सुरू