वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यात ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूवरून वाद पेटला आहे. केंद्र सरकारने याबाबतची माहिती मागविणारे पत्र पाठविल्याचे मांडविया यांनी ठणकावून सांगितले असून या प्रश्नी सिसोदिया यांची बोलती बंद केली आहे. Sent a letter requesting information about the deaths of corona patients due to lack of oxygen; Mandvia cleared to Sisodia
सिसोदिया यांच्या मते केंद्र सरकारने ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबतची माहिती राज्य सरकारकडे मागितली नाही. परंतु मांडविया यांनी हा आरोप खोडून काढताना सांगितले की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंबाबत दिल्ली सरकारशी पत्रव्यवहार केला. या संदर्भात २६ जुलै रोजी पाठवलेले पत्रही ट्विटरवर शेअर केले आहे. मेलचा स्क्रीनशॉट पोस्ट करताना मांडवीया यांनी ट्विट केले, ‘आदरणीय सिसोदिया जी, माझ्या मंत्रालयाने २६ जुलै रोजी दिल्ली सरकारला पाठविलेल्या मेलची प्रत येथे आहे. अजून उशीर झालेला नाही! १३ ऑगस्ट पर्यंत, आपण डेटा पाठवू शकता जेणेकरून आम्ही संसदेला प्रश्नाचे उत्तर देऊ शकू. कृपया आवश्यक डेटा शक्य तितक्या लवकर पाठवा.
सिसोदिया यांचा आरोप नेमका काय आहे
सिसोदिया यांनी मंगळवारी आरोप केला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूचा तपशील मागणारे कोणतही पत्र दिल्ली सरकारला केंद्राकडून प्राप्त झाले नाही. आम्ही सर्व माहिती केंद्राशी शेअर करण्यास तयार आहोत.
सिसोदिया म्हणाले, ‘मी वृत्तपत्रात बातमी वाचली की केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या अभावामुळे झालेल्या मृत्यूंबाबत राज्यांकडून माहिती मागितली आहे. परंतु ऑक्सिजनच्या अभावामुळे झालेल्या मृत्यूबाबत दिल्ली सरकारला कोणतेही पत्र मिळाले नाही. जेव्हा तुम्ही (केंद्र) कोणतेही पत्र लिहिले नाही, तेव्हा राज्य तुम्हाला माहिती देत नाहीत, असे तुम्ही कसे म्हणू शकता? आम्ही चौकशी समितीला कळवले होते. पण दिल्लीच्या उपराज्यपालांनी तसे होऊ दिले नाही.
तेरा राज्यांचा अहवाल केंद्राकडे
अरुणाचल प्रदेश, आसम, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर, लडाख, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह १३ राज्य और केंद्र शासित प्रदेश यांनी मंगळवारी केंद्र सरकारला माहिती दिली आहे. ऑक्सिजनभावी चार जणांचा मृत्यू झाल्याचे पंजाब सरकारने स्पष्ट केले.
Sent a letter requesting information about the deaths of corona patients due to lack of oxygen; Mandvia cleared to Sisodia
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, “राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”
- संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता
- “दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत” वडेट्टीवारांचा सणसणीत टोला
- आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांनाही होणार दंड, रिझर्व्ह बँकेने दिले हे निर्देश