प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार आणि विनोदी लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मिरासदार हे साहित्य वर्तुळात ‘दमा’ आणि ‘दादासाहेब’ या नावाने प्रसिद्ध होते. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांचे एकत्रित कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात प्रचंड गाजले होते. Senior Literary Writer, Storyteller Ma. Mirasdar passed away due to old age
‘बापाची पेंड’ या सन १९५७ साली प्रकाशित आलेल्या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना ग्रामीण कथाकार अशी मान्यता मिळवून दिली. या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे हुबेहूब, विरंगुळा, स्पर्श, मिरासदारी आणि अलिकडेच प्रकाशित झालेला भोकरवाडीच्या गोष्टी हे कथासंग्रह लोकप्रिय ठरले. मिरासदार यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे. त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनातील विसंगती, विक्षिप्तपणा आणि इरसालपणाच्या आधाराने आपला विनोद फुलवला.
मिरासदार यांनी ललितलेखनही केले आहे. सरमिसळ, गप्पांगण हे त्यांचे ललित लेखसंग्रह देखील गाजले. ललित लेखनासोबतच मिरासदार यांनी एकांकिकाही लिहिल्या. त्यांच्या एकांकिका सु्ट्टी व पाच एकांकिका या नावाने प्रसिद्ध आहेत.
मराठी साहित्यविश्वात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी विनोदी लेखनाची परंपरा जोपासली. हीच परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.
पटकथाकार दमा
द. मा. मिरासदार यांच्या नावावर तब्बल १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखना करतानाच त्यांनी हेडमास्तरची भूमिकाही साकारली होती.
Senior Literary Writer, Storyteller Ma. Mirasdar passed away due to old age
महत्त्वाच्या बातम्या
- लुकआऊट नोटीस : महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले , २१ ऑक्टोबरपर्यंत परमबीर सिंग यांना अटक होणार नाही
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर भाजपच्या तालुकाध्यक्षाचाच आत्महत्येचा प्रयत्न
- तपस्वी राजा श्री रामचंद्रानंतर योगी आदित्यनाथ, महाराज तुमचे राज्य चालू राहो, कंगना रनौटने दिल्या योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा
- स्थलांतरितांबद्दलच्या ज्यो बायडेन यांच्या धोरणाला झटका, वरिष्ठ सिनेटर एलिझाबेथ मॅकेडोनो यांनी विरोध करत महत्त्वाकांक्षी योजना नाकारली