विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आतापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची घुसखोरी भारतात होत होती. पण आता त्यात बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भर पडली असून बांगलादेशातला वरिष्ठ पोलीस अधिकारी आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी केली. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने त्याला पकडला. पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आज बशीरहाट न्यायालयाने आरिफ उज जमान याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.Senior Bangladeshi police officer infiltrated India
या घुसखोरीची कहाणी अशी :
आरिफ उज जमान हा बांगलादेशातल्या रंगपूर जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी होता. बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथवून नोबेल पुरस्कार प्राप्त हुकूमशाह मोहम्मद युनूस याने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आरिफ उज जमान याने पोलीस ड्युटीवर जायचे थांबविले. त्यानंतर त्याला बांगलादेशी प्रशासनाने बडतर्फ केले. त्याने बांगलादेशात राहण्यापेक्षा भारतात आश्रय मागावा या हेतूने भारतात घुसखोरी केली. 24 परगणा जिल्ह्यातल्या हकीमपूर सेक्टर मधून तो भारतात घुसला. परंतु तो सीमा सुरक्षा दलाच्या जाळ्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला अटक करून त्याच्याकडची सगळी कागदपत्रे तपासली. त्याची पार्श्वभूमी तपासून त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले. बशीरहाट न्यायालयाने त्याला आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आत्तापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची भारतात घुसखोरी होत होती. त्या घुसखोरीला बांगलादेशी पोलीस आणि बांगलादेशाचे सैन्य चिथावणी होते. भारताने साडेचार हजार किलोमीटरची सीमा सील करू नये यासाठी बांगलादेशी राज्यकर्त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. त्यामुळे साधारण अडीच हजार किलोमीटर सीमाच सील होऊ शकली. उरलेली सगळी सीमा अजूनही मोकळीच आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसखोरी करायला मोकळे रान मिळाले आहे. पण आत्तापर्यंत फक्त मजूर आणि कामगार भारतात घुसखोरी करत असताना पोलीस अधिकाऱ्यांची घुसखोरी कधी आढळली नव्हती. पण आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी करून बांगलादेशातील परिस्थिती किती गंभीर आणि चिघळलेली आहे, हेच दाखवून दिले.
Senior Bangladeshi police officer infiltrated India; arrested by BSF; connection with power shift!!
महत्वाच्या बातम्या
- Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना डिसेंबरपर्यंत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- MM Naravane : माजी लष्करप्रमुख म्हणाले- भारत-चीन संबंध सुधारत आहेत; पुढे जाऊ तसा चीनही सद्भावनेला प्रतिसाद देईल
- Rajnath Singh : राजनाथ सिंह म्हणाले- मुनीर यांनी आपले अपयश स्वीकारले; भारताने कठोर परिश्रमाने फरारी कारसारखी अर्थव्यवस्था उभारली
- Shakti Samvad : राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यांच्या महिला आयोगांची बांधली एकजूट; सुरक्षितता आणि सक्षमीकरणाबरोबरच महिलांना दिला शक्तीचा आत्मविश्वास!!