नाशिक : एरवी कुठलेही विषय, कितीही कठीण आणि गहन असले, तरी ते शरद पवारच सोडवतात. महाराष्ट्रातल्या काय किंवा देशातल्या काय सगळ्या जगभरातल्या समस्यांची पवारांना जाण आहे. त्या सगळ्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरे पवारांकडेच आहेत, अशा डिंग्या मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक वेगळीच राजकीय मजबुरी गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये समोर आली. राष्ट्रवादीतली घोटाळखोरी आणि सगळे “पवार संस्कारित” शरद पवारांच्या नव्हे, तर अमित शाहांच्या दारी!!, हे राजकीय चित्र घेण्यात दोन-तीन दिवसांमध्ये राजधानी दिसून आले.Scams in NCP; Everyone is at the door of “Pawar cultured” Amit Shah!!
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन सुद्धा त्या पक्षातल्या घोटाळखोर नेत्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. उलट त्या वाढल्या. खुद्द अजित पवारांच्या नेतृत्वाला घरघर लागली. कारण पार्थ पवारचा जमीन घोटाळा उघड्यावर आला. त्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे देऊन फ्लॅट लाटण्याचा फटका 30 वर्षांनंतर बसला. त्यांना कारावासाची शिक्षा झाली. अटक होईल आणि मंत्रिपद जाईल, या भीतीने ते आजारी पडले. ते लीलावतीत दाखल झाले.
- मुंबईकर नागरिकांसाठी फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट; २९५ एकर जागेवर उभारणार जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क!
– सुप्रिया सुळेंबरोबर पाच खासदार अमित शाहांकडे
या सगळ्या मोठ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार परवाच अमित शाहांच्या भेटीला पोहोचले. त्यांना अचानक आपापल्या मतदारसंघांमध्ये “अतिमहत्त्वाची” कामे आठवली, की जी शरद पवार नव्हे, तर फक्त अमित शाहाच सोडवू शकतात, असे त्यांना वाटले. म्हणूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली “पवार संस्कारित” खासदारांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांना वेगवेगळी कामे करायची विनंती केली.
– सुनील तटकरे भेटीला
त्यांच्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे अमित शहा यांच्या भेटीला गेले महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनी आतून किंवा बाहेरून एकत्र येण्यासंदर्भात तटकरे यांनी अमित शाह यांची परवानगी मिळवली निदान तशी बातमी पवार बुद्धीच्या माध्यमांनी दिली.
– धनंजय मुंडेंची भेट
णिकराव कोकाटे यांच्या अटकेचा मुहूर्त अमित शाहांच्या भेटीसाठी गाठला. त्यामुळे माणिकराव कोकाटे जर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून बाहेर जाणार असतील तर आपला त्या मंत्रिमंडळात पुन्हा नंबर लागावा, यासाठी मुंडे यांनी अमित शाहांचे उंबरठे झिजवल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली.
एरवी हेच सगळे पवार संस्कारित नेते शरद पवारांच्या घरी जाऊन आपापले प्रश्न सोडवत किंवा मिटवून घेत असत, पण आता या सगळ्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा आपली घोटाळाखोरी बाहेर येऊन आपल्याला त्रास होऊ नये, या हेतूसाठी अमित शहांची भेट घ्यावी लागली. अमित शाह यांनी या सगळ्यांना भेट दिली, पण त्यांच्याकडून आलेल्या अधिकृत पत्रकांशिवाय बाकी कुठली कामे करण्याची आश्वासने त्यांना दिली नाहीत किंवा त्यांच्या कुठल्याही भेटीची दाखल आपल्या स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर घेतली नाही. आम्हीच अमित शाहांना जाऊन भेटलो, अशी ट्विट सुप्रिया सुळेंसकट बाकीच्या खासदारांनी आणि पवार संस्कारित नेत्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर केली.
पवार संस्कारित नेत्यांच्या या राजकीय कृतीमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात आता खुद्द पवारांच्या राजकीय महत्त्वापेक्षा अमित शाहांचे महत्त्व जास्त वाढले, हेच यातून स्पष्ट झाले.
Scams in NCP; Everyone is at the door of “Pawar cultured” Amit Shah!!
महत्वाच्या बातम्या
- महायुतीत अजितदादा एकाकी; राष्ट्रवादीचा होणार political size कमी!!
- पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
- Goa Nightclub : गोवा अग्निकांड- जेवण करायला बाहेर पडले आणि लूथरा बंधूंना पकडले; थायलंडमध्ये हद्दपारीची प्रक्रिया सुरू
- Syria : सीरियामध्ये अमेरिकन सैनिकांवर ISIS चा हल्ला; 3 ठार, ट्रम्प म्हणाले- सडेतोड उत्तर देईन