वृत्तसंस्था
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही. पण, बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल, असे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले. Satara District Central Co-operative Bank should avoid the elections and Give the election expenses to the members; Udayanraje Advise
जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण शुक्रवारी झाली. त्या अनुषंगाने राजे बँकेत आले होते. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक हाेणार आहे. शुक्रवारी कार्यकारिणीची अंतिम सर्व साधारण सभा होती. या सभेपूर्वी खासदार उदयनराजे बँकेत दाखल झालेत. त्यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.
दरम्यान,जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थित चालली असताना इडीची नोटीस का ? असा प्रश्न राजेंनी उपस्थित केला आहे.