• Download App
    SARTHI : शिवसेना खासदाराच्या सूनबाई बनल्या संभाजी राजांच्या सारथी ....चर्चा तर होणारच.. कौतुक-नवल व्हिडिओ व्हायरल ...SARTHI: Shiv Sena MP's daughter-in-law becomes Sambhaji Raja's charioteer ....

    SARTHI : शिवसेना खासदाराच्या सूनबाई बनल्या संभाजी राजांच्या सारथी ….चर्चा तर होणारच.. कौतुक-नवल…व्हिडिओ व्हायरल ….

    सोशल मीडियावर अगदी काही क्षणात व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा चारचाकी गाडीतील प्रवासाचा.


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिवजयंतीला खासदार संभाजराजे नाशिक येथे गेले असता एक आगळे वेगळे चित्र पाहावयास मिळाले . शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या सूनबाई चक्क संभाजीराजांच्या गाडीचे सारथ्य करत होत्या .हे दृश्य पाहून सर्वांनाच नवल वाटले . संभाजीराजे देखील त्यांना पाहून अचंबित झाले होते .गाडीचं सारथ्य एक महिला करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अन् सर्वत्र चर्चा सुरू झाली .SARTHI: Shiv Sena MP’s daughter-in-law becomes Sambhaji Raja’s charioteer ….

     

    शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार संभाजीराजे हे नाशकमध्ये दाखल झाले होते. नाशिकरोडहून ते देवळाळी कॅम्पच्या (Nashik Road to Devlali Camp) परिसरात जात असताना त्यांच्या गाडीचं सारथ्य एका महिलेनं केलं आहे. यावेळी संभाजीराजे हे पुढेच बसले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी संभाजीराजेंचे फोटो काढण्यासाठी आजूबाजूला गर्दी झाली होती. त्यामुळे गाडी चालवणारी ती महिला नेमकी कोण होती असा प्रश्न अनेकांना पडला.

    व्हायरल झालेला हा व्हिडिओ 18 फेब्रुवारीला सांयकाळी नाशिकमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. उपस्थितांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. खासदार संभाजी राजे हे खासदार हेमंत गोडसे यांच्या घरी भेट द्यायला जाणार होते.

     

     

    त्यावेळी त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी हेमंत गोडसे यांनी एक गाडी संभाजी राजेंना रिसीव्ह करण्यासाठी पाठवली होती. स्वतः हेमंत गोडसे हे दिल्लीत असल्यामुळे त्यांना संभाजी राजेंना आणायला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी आपल्या सूनेवर टाकली. हेमंत गोडसे यांनी सून भक्ती गोडसे या गाडी घेऊन संभाजीराजे भोसले यांना घेण्यासाठी गेल्या होत्या.

    हेमंत गोडसे यांची सून आपल्याला रीसिव्ह करायला आली आहे, हे पाहून संभाजी राजेंनाही नवल वाटलं. यावेळी हेमंत गोडसे यांची सून भक्ती गोडसे यांनी मी तुमची गाडी चालवू का, असा प्रश्न असता संभाजीराजेंनीही परवानगी देत आपल्या गाडीचं सारथ्य भक्ती गोडसे यांना करायला दिलं.

    नेहमीपेक्षा काहीसं वेगळं चित्र दिसल्यानं हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी लगबग सुरु होती. यावेळी संभाजीराजे यांनी त्याच्या ड्रायव्हिंगचं कौतुकही केले. नाशिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उत्सव सोहळ्याला भेट देण्यासाठी आले असता हा किस्सा घडला आहे.

     

    SARTHI: Shiv Sena MP’s daughter-in-law becomes Sambhaji Raja’s charioteer ….

     

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??