• Download App
    कर्तृत्वशालिनी..!सरोजिनी नायडूSarojini Naidu International_Women's_Day_Special

    कर्तृत्वशालिनी..!सरोजिनी नायडू #International_Women’s_Day_Special

    सरोजिनी नायडू : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महिलांनी फार मोठी भूमिका बजावली, त्यामध्ये सरोजिनी देवी नायडू यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत बुद्धिमान आणि लहान वयातच असामान्य ग्रहण क्षमता असल्याने सरोजिनींचे बालपण उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले. त्या अतिशय तरुण वयात काँग्रेसशी संलग्न झाल्या. Sarojini Naidu International_Women’s_Day_Special

    जन्मजात कवयित्री असलेल्या सरोजिनी देवींवर लोकमान्य टिळक, भारत सेवक गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा गांधी यांचा विलक्षण प्रभाव होता. 1925 मध्ये सरोजिनी देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द महात्मा गांधींच्या राजकीय चळवळीत बहरली.

    https://youtube.com/shorts/wjKZxLyusaY?feature=share

    1927 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय महिला परिषदेच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. आफ्रिका अमेरिकेतील महिला परिषदांमध्ये सरोजिनी देवींनी भारत असे यशस्वी प्रतिनिधित्व केले. 1930 मध्ये महात्मा गांधींच्या दांडीयात्रेत ज्या मोजक्या महिला आघाडीवर सहभागी झाल्या
    त्यामध्ये सरोजिनी देवी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय या प्रमुख महिला नेत्या होत्या.

    यानंतरही सरोजिनी देवी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी यांच्या समवेत आघाडीवरच राहिल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांना त्यावेळच्या संयुक्त प्रांताचे म्हणजे सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यपाल नेमले. स्वतंत्र भारतातल्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. सरोजिनी देवींचे राजकीय आणि सामाजिक जीवन अत्यंत उच्च अशा बौद्धिक आणि भावनिक वातावरणात गेले. त्या समस्त भारतीय महिलांसाठी प्रेरणास्थान बनवून राहिल्या आहेत.

    Sarojini Naidu International_Women’s_Day_Special

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!