विशेष प्रतिनिधी
मुंबई: सचिन तेंडुलकरची एकुलती एक मुलगी सारा तेंडुलकरने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. नुकतेच साराने सोशल मीडियावर आपल्या नवीन मोहिमेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.Sara Tendulkar enters in modeling
https://www.instagram.com/reel/CXJAxrnhUU2/?utm_source=ig_web_button_share_sheet
साराने अजिओसोबत एक नवीन कॅम्पेन शूट केलं आहे. या कॅम्पेनमध्ये अभिनेत्री बनिता संधू आणि उद्योगपती जयदेव श्रॉफ यांची मुलगी तान्या श्रॉफ या दोघीही सहभागी झाल्या आहेत.
तिघींनी मिळून या खास कॅम्पेनचे शूटिंग केले आहे, ज्याचे फोटो खूप व्हायरल होऊ लागले आहेत.
जाहिरातीत सारा खूपच सुंदर दिसत आहे. तिने पिवळा बॉडी फिट ड्रेस परिधान केला आहे आणि केस बांधले आहेत.
याशिवाय ती एका हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्येही दिसली. यादरम्यान सारा एखाद्या अनुभवी आणि परिपक्व मॉडेलप्रमाणे एक्सप्रेशन देत होती.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन म्हणजेच सुमारे 16 लाख फॉलोअर्स आहेत. सारा तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.