• Download App
    Sanjay raut will send legal notice claiming 1.25 rupee to bjp leader chandrakant patil over his allegations in open letter

    चंद्रकांतदादांची किंमत सव्वा रुपया ठरवत संजय राऊत ठोकणार अब्रूनुकसानीचा दावा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या खंजीर खुपसण्याच्या राजकारणाचा पुढचा अध्याय आता सुरू झाला आहे. “खंजीर खुपसणे” या वाक्प्रचाराचा बरोबरच महाराष्ट्रात आता “प्रोटोकॉल तोडणे, “किंमत सव्वा रुपया” वाक्प्रचार प्रचलित होऊ घातले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात शब्द युद्ध रंगले आहे. Sanjay raut will send legal notice claiming 1.25 rupee to bjp leader chandrakant patil over his allegations in open letter

    भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर शिवसेनेने अग्रलेख लिहून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवले. त्या पत्रावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे. चंद्रकांत पाटलांनी आमच्या एका अग्रलेखावर पत्र पाठवले. आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांना आमच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही “फ्रिडम ऑफ स्पीच” मानतो आणि म्हणूनच त्यांचं पत्र आजच्या सामनात छापले. जेणेकरून पाटलांची विषारी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असे राऊत यांनी सांगितले.

    पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाहीत. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. पाटलांनी जे म्हटलेय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची किंमत केवळ सव्वा रुपया आहे,” अशी टीका राऊत यांनी केली आहे. तसेच भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केलंय. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का, असा सवालही राऊतांनी केला.

    – काय म्हणाले होते चंद्रकांतदादा??

    मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले ५० लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की ५० लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असे पाटलांनी म्हटलंय.”

    Sanjay raut will send legal notice claiming 1.25 rupee to bjp leader chandrakant patil over his allegations in open letter

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…