• Download App
    Sanjay Raut press : दुसरी पत्रकार परिषद - मागच्यावेळी शक्तिप्रदर्शन आज नाही - मागच्यावेळी शिवराळ भाषा ; आज म्हणे भानामती - राऊतांचं टार्गेट काय?Sanjay Raut press: Second press conference - What is the target of Raut?

    Sanjay Raut press : दुसरी पत्रकार परिषद – मागच्यावेळी शक्तिप्रदर्शन आज नाही – मागच्यावेळी शिवराळ भाषा ; आज म्हणे भानामती – राऊतांचं टार्गेट काय?

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते एक जबरदस्त बॉम्ब फोडतील असं त्यांनी सांगितलं होतं . पण त्यांनी आता पुढची तारीख दिलीये.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :आज संजय राऊत यांची दुसरी पत्रकार परिषद सुरु आहे.यावेळी मात्र शक्तिप्रदर्शन न करताच पत्रकार परिषद सुरु झाली आहे .संजय राऊत आज काय गोप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्यावेळी राऊत यांनी किरीट अर्वाच्य शिवीगाळ करत पत्रकार परिषद गाजवली होती मात्र यावेळी त्यांनी IT ला टार्गेट करत आयटीची भानामती सुरु आहे असं वक्तव्य केलं आहे .तसेच  पंतप्रधानांकडे जाणार असल्याचेही ते म्हणाले…Sanjay Raut press: Second press conference – What is the target of Raut?

    संपूर्ण देशात ईडीची सर्वाधिक छापेमारी, तपास हा महाराष्ट्रात होत आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांविरुद्ध कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ७ लोकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. भाजपच्या लोकांविरुद्ध ना आयटी (आयकर विभाग), ना ईडी. ते लोक मुंबईतील रस्त्यांवर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?”

    इन्कम आणि टॅक्स फक्त आमच्याकडेच आहे का? इन्कम टॅक्सची जी भानामती सुरू आहे, ती सुद्ध लवकरच समोर येईल. ही भानामती कोण करत आहे, जे हे सगळं बघत आहे, त्याबद्दल लवकरच शिवसेना मोठा खुलासा करणार आहे.”

    पाहा काय म्हणताय संजय राऊत ?

    मुंबईत धाडीवर धाडी -आम्ही सुद्धा धाडी टाकण्याचा विचार केला

    शिवसनेनेला त्रास देण्यासाठी धाडी सुरु

    पालिका निवडणुकीपर्यंत धाडी सुरुच राहतील

    इनकम टॅक्स आणि ईडीला आतापर्यंत 50 नावं दिली

    केंद्रिय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार

    केंद्रिय मंत्र्यांविरोधात किरीट सोमैय्यांनीच पुरावे दिले

    केंद्रीय यंत्रणा त्या मंत्र्यांच्या घरावर धाडी का टाकत नाही?

    दिल्ली, महाराष्ट्र नेत्यांच्या

    पंतप्रधान मोदींकडे पुरावे सादर करणार

    सोमैय्या हे ईडीचे वसुली एजंट

    ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहे

    ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट

    पुढच्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांची नावं घेऊन सांगणार

    काहीही करा महाराष्ट्रात मविआचं सरकार राहणार

    राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडा पाडणार असल्याचा इशारा दिला. यावेळी राऊतांनी ईडी आणि आयकर विभागाकडून ठराविक लोकांवरच कारवाया होत असल्याचाही आरोप केला.

    Sanjay Raut press: Second press conference – What is the target of Raut?

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस