अत्यंत स्फोटक अशी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यांनी आधी जाहीर केल्या प्रमाणे शिवसेना भवन मुंबई या ठिकाणी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीकेची तोफ डागत अनेक आरोप केले आहेत. तसंच मोहीत कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा लाडका आहे मात्र तो त्यांना बुडवणार आहे असंही म्हटलं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी एका ओळीचं ट्विट करून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.SANJAY RAUT PRESS
काय आहे अमृता फडणवीस यांचं ट्विट?
आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है..#Maharashtra असं एका ओळीचं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
आज एका मांजराने पुन्हा एकदा डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची अमृता फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे.