शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे.
Sanjay raut Nilesh Rane latest news
अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजप सरकारवर निशाणा साधला. राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा सवाल केला होता.
यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, ज्यांचे घरच वर्गणीतून चालते तेच मंदिर वर्गणीतून बांधणार काय असे विचारत आहेत. जनाची नाही पण किमान मनाची तरी ठेवा. भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून लक्ष्य करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार? ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते.
Sanjay raut Nilesh Rane latest news
देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पधार्ची काळजी करा, असं म्हणत भातखळकरांनी शिवसेनेला टोला लगावला.