विशेष प्रतिनिधी
मुंबई : उध्दव ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी ओरिजिनल राहिली आहे की नाही याचा फैसला महाराष्ट्रातील जनताच करेल. परंतु, खासदार संजय राऊत यांनी ट्विट तरी किमान ओरिजिनल करावेत. ढापाढापी करू नये, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचे ट्विट चोरल्याचा दावा त्यांनी केला आहे. sanjay raut news
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक इमेज ट्विट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जे लोक म्हणत आहेत की कृषि कायद्याला केवळ पंजाबच्या लोकांचाच विरोध आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की स्वातंत्र्यलढ्यात फाशीवर गेलेल्या १२१ क्रांतीकारकांपैकी ९३ पंजाबी होते. sanjay raut news
जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या २६२६ क्रांतीकारकांपैकी २१४७ पंजाबी होते. त्यावेळी जर इंग्रज म्हणाले असते की संपूर्ण देशाला गुलामीबाबत काही वाटत नाही. गुलामीला केवळ पंजाब्यांचाच विरोध का आहे? तर काय झाले होते.
sanjay raut news
राऊत यांच्या या ट्विटवर अशोक श्रीवास्तव यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट केलेली इमेज कोणी पाठविली अशी विचारणा श्रीवास्तव यांनी केली आहे. हे कोणी लिहिले आणि पाठविले हे त्यांनी सांगितले नाही तर पत्रकारितेच्या भाषेत याला ढापाढापी म्हटले जाईल, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. किमान ट्विट तरी स्वत:चे करत जात, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.