• Download App
    संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला! | The Focus India

    संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला!

    आपल्या वाचाळपणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अनेकदा अडचणीत आणणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा राऊत यांचे पालक शरद पवार यांनी दिलेला नाही तर डॉक्टरांनीच दिला आहे.  sanjay raut latest news


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आपल्या वाचाळपणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अनेकदा अडचणीत आणणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा राऊत यांचे पालक शरद पवार यांनी दिलेला नाही तर डॉक्टरांनीच दिला आहे. sanjay raut latest news

    गुरुवारी लिलावती रुग्णालयात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा व कमी बोलण्याचा सल्ला शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे.

    रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी ते म्हणाले की, मीडियाशी बोलू नका, असं डॉक्टरांनी सांगितलंय. काही तणाव आहेत पण मी बेफिकरीपणाने राहतो. यापुढं सर्वच पथ्यपाणी नीट पाळणार आहे. पुन्हा रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये असा प्रयत्न करणार आहे. मागील वेळी शस्रक्रिया झाली होती, पण काही गोष्टी राहिल्या होत्या. कोविडमुळे उपचार होऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं हे सर्व करून घ्यायला सांगितले.

    sanjay raut latest news

    डॉक्टरांनी राऊत यांना दिलेला सल्ला महाविकास आघाडी सरकारसाठी फायदेशीरच ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राऊत यांनीच अभिनेत्री कंगना रनौटशी वाद ओढवून घेतला.

    संजय राऊत यांचे ट्विट चौर्यकर्म उघड? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचे ट्विट चोरल्याचा दावा

    मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम पाडल्यावरही त्यांनी याबाबत वक्तव्ये केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांच्यावर आणि सरकारवर ताशेरेही ओढले होते.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!