• Download App
    मराठा आरक्षणात गडबड झाल्यास ठाकरे - पवार सरकार जबाबदार; संभाजीराजे यांचा इशारा | The Focus India

    मराठा आरक्षणात गडबड झाल्यास ठाकरे – पवार सरकार जबाबदार; संभाजीराजे यांचा इशारा

    • मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठा समाजासाठी ठाकरे – पवार सरकारने EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याच मराठा  समाजाच्या आऱक्षणाला फटका बसण्याची शक्यता खासदार संभाजीराजे यांनी वर्तवली आहे. जर आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे ठाकरे – पवार सरकारच जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. Sambhaji raje takes a dig at Thackeray – pawar govt over maratha reservation issue

    मराठा समाजासाठी ठाकरे – पवार सरकारने EWSचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या केंद्राच्या १० टक्के आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. Sambhaji raje takes a dig at Thackeray – pawar govt over maratha reservation issue

    खासदार संभाजीराजे म्हणाले, “खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे EWS चे आरक्षण देण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाला SEBC प्रवर्ग तयार केल्याने त्यांना हे आरक्षण मिळत नव्हतं. पण केंद्रीय आरक्षणानुसार आधीच मराठा समाजाला १०% आरक्षण मिळत होते.

    यामध्ये इतरही अनेक समाजांचा समावेश आहे. त्यामुळे हे केवळ मराठा समाजासाठीच दिले आहे असे म्हणता येत नाही. यावरुन सरकारला मी पहिल्यापासून सांगतो आहे की आपण मराठा समजासाठी EWS चे आरक्षण दिले तर त्यामुळे SEBC ला धोका निर्माण होऊ शकेल का? त्यापेक्षा सुपरन्युमररीचा पर्यायही मी सरकारला दिला होता. सरकारच्या निर्णयानंतर यावर सकल मराठा समाज काय भूमिका घेईल ते त्यांनी मला सांगावं, त्यांच्या भूमिकेनुसार मी जाईन.”

    “कोर्टाने यापूर्वी एका प्रकरणात जर EWS चे आरक्षण घेतले तर SEBCचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल दिला आहे, हे सरकारी वकील अॅड. पटवालिया यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार असताना जर यामध्ये काही घोटाळा झाला तर याला जबाबदार कोण असणार? मी परखडपणे सांगू इच्छितो की याला ठाकरे – पवार सरकारच जबाबदार असेल. त्यामुळे २५ तारखेच्या सुनावणीदरम्यान सरकार नक्की काय करेल याबाबत मलाच प्रश्नचिन्ह वाटतेय. सरकार हतबल झाल्याचीच मला आता शंका वाटते. त्यामुळे पुढील सुनावणीची तयारी करण्याऐवजी सरकार ही पळवाट काढत आहे” असा आरोप यावेळी संभाजीराजे यांनी केला.

    सारथी संस्था चालवायची नसेल तर बंद करा

    ‘सारथी’ संस्था ही शाहू महाराजांचं जीवनस्मारक आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी ती उभारण्यात आली आहे. त्याची परिस्थितीही बिकट आहे, यामुळे सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच मला कळत नाहीए. शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत.

    Sambhaji raje takes a dig at Thackeray – pawar govt over maratha reservation issue

    त्यामुळे त्यांनी सारथीच्या विषयामध्ये हस्तक्षेप करायला हवा. वर्ष होऊन गेले तरी या संस्थेला अजूनही कसली स्वायत्तता नाही. केवळ नावासाठीच ही संस्था ठेवायची असेल तर सरकारनं ती कशाला सुरू ठेवलीय, असा संतप्त सवालही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी केला.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…