विशेष प्रतिनिधी
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यानी आज अचानक आंदोलन केले.
मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि इतर विषयी चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी पत्र लिहून मागितली होती. पण ती दिली नाही, असा आरोप करत संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
- -आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
- -संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते चर्चेसाठी आले होते
- – संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना वेळ दिली नाही
- – संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी आंदोलन केले
- – आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- – कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यानी दिल्या