मेरा भारत महोत्सव ७५च्या बोधचिन्हाचे अनावरण
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. sacrifices of freedom fighters Should be Remember: Ramdas Aathwale
आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आणि देशभरातील ७५ सामाजिक संस्थांतर्फे आयोजित मेरा भारत महोत्सव ७५ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण रामदास आठवले यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
तब्बल १५० वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले. अनेक नेत्यांच्या संघर्षातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी स्वातंत्रचळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आपला देश एक आहे,असे आठवले म्हणाले. यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, डॉ. स्वप्नील शेठ, समीर देसाई, प्रणव पवार, संतोष फुटक, उत्तमराव मांढरे संतोष पोतदार,पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.
sacrifices of freedom fighters Should be Remember: Ramdas Aathwale
- बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे
- मेरा भारत महोत्सव ७५च्या बोधचिन्हाचे अनावरण
- आम्ही पुणेकर संस्था आणि ७५ संस्थांतर्फे मेरा भारत महोत्सवाचे आयोजन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक देश