• Download App
    Russia Ukraine War : मोदी मोठे नेते ! भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांनी मोदींकडे मागितली मदत दिला महाभारत अन् चाणक्याच्या दाखला... Russia Ukraine War: Modi is a great leader! India should mediate to end the war; Ukraine's ambassador asks Modi for help

    Russia Ukraine War : मोदी मोठे नेते ! भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांनी मोदींकडे मागितली मदत दिला महाभारत अन् चाणक्याच्या दाखला…

    मोदी हे जागतिक स्तरावर सर्वात शक्तिशाली आणि आदरणीय नेते.


    युक्रेनच्या वतीने भारताच्या पंतप्रधानांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेनच्या भारतातील राजदूताने याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.


    रशियाने युक्रेनवर हल्ला केला, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर शहरांमध्ये रणगाडेही दाखल झाले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रशियायाने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनच्या राजदूताने महाभारताचा आणि चाणक्याचासंदर्भ देत मोदींना संकटात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे .Russia Ukraine War: Modi is a great leader! India should mediate to end the war; Ukraine’s ambassador asks Modi for help

    पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन

    युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना आवाहन करत त्यांनी याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ बोलायला हवे. युक्रेनच्या राजदूतांनी सांगितले की, राजधानी कीवजवळही हल्ले झाले आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. पंतप्रधान मोदी खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांना यावेळी मदतीचे आवाहन करतो. जगातील तणाव केवळ भारतच कमी करू शकतो. त्यांनी सांगितले की, युक्रेनकडून पाच रशियन विमाने पाडण्यात आली आहेत.

    भारतातले युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा (Igor Polikha) म्हणाले की, भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

    मोदी हे जागतिक स्तरावर सर्वात शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. पुतीन इतर किती नेत्यांचं ऐकतील हे मला माहीत नाही. पण मोदींसोबत त्यांचे सौदार्हयाचे संबंध आहेत. त्यामुळे मोदी यात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी आशा आहे, असं इगोर पोलिखा यांनी म्हटलं आहे.

    भारत हा UN सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आणि प्रभावी देश आहे. युक्रेन हा भारतासारखा लोकशाही देश असल्याचं राजदूत यांनी म्हटलं आहे.

    रशिया युक्रेन वादावर भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून युद्धाबाबत तटस्थ असल्याचं सांगण्यात आलं आहे तसंच शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशाही व्यक्त करण्यात आली आहे.

    संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन बैठकीत भारताने युक्रेनमध्ये शिकणाऱ्या आणि नोकरीनिमित्ताने राहणाऱ्या 20 हजार भारतीयांच्या सुरक्षेची काळजी असल्याचं सांगितलं आहे.

     

    Russia Ukraine War: Modi is a great leader! India should mediate to end the war; Ukraine’s ambassador asks Modi for help

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला