• Download App
    RUSSIA- UKRAIN-INDIA :भारतात परतले विद्यार्थी - मायदेशात झाले मायबोलीत स्वागत !जेव्हा स्मृती ईराणी म्हणाल्या महाराष्ट्रातील कोण कोण आलंय ?... RUSSIA-UKRAIN-INDIA: Students returning to India - Welcome in their own country! When Smriti Irani asked in four languages ...

    RUSSIA- UKRAIN-INDIA :भारतात परतले विद्यार्थी – मायदेशात झाले मायबोलीत स्वागत !जेव्हा स्मृती ईराणी म्हणाल्या महाराष्ट्रातील कोण कोण आलंय ?…

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दिल्लीत परतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात येथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या लोकल भाषांमध्ये संवाद साधला आणि मायदेशी परतल्यावर त्यांचे स्वागत केले.


    संबंधित राज्यांच्या विद्यार्थ्यांनी स्मृती इराणी यांच्या ‘ बहुभाषी ‘ स्वागतास टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. राजकारणापलीकडे बहुभाषी अभिनेत्री आणि बहुमुखी कलाकार स्मृती इराणींना इंग्रजी, हिंदी, बंगाली, पंजाबी, मराठी आणि गुजराती भाषेचे उत्तम ज्ञान आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: महाराष्ट्रातील कोण कोण आहे ?असा आवाज युक्रेनमधून परतलेल्या विमानात घुमला आणि सारे चकित झाले .
    मायदेशात परतताच मायबोली ऐकून विद्यार्थ्यांना भरून आले होते आणि समोर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी त्यांचं स्वागत करत होत्या .
    युक्रेनहुन दिल्लीत दाखल झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे विमानतळावर जाऊन स्वःत इंडिगो विमानात प्रवेश करून अनोखे स्वागत केले. सर्वच भावूक झाले होते.
    RUSSIA-UKRAIN-INDIA: Students returning to India – Welcome in their own country! When Smriti Irani asked in four languages …

    स्मृती इराणींनी नागरिकांना सुखरूप देशात आणणाऱ्या इंडिगो च्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.

    याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओमध्ये स्मृती इराणी म्हणताना दिसत आहेत, “घरी स्वागत आहे! तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही धैर्य दाखवल्या बद्दल तुमचे आभार. फ्लाइट क्रूचेही आभार.”

    त्या पुढे म्हणाल्या, ” देशात आपले स्वागत. आपला परिवार श्वास रोखून वाट बघत आहे. अत्यंत कठीण काळात आपण अद्भुत धैर्य दाखविले. इंडिगोत कार्यरत मान्यवरांचेही कौतुक केले पाहिजे. ” विशेष म्हणजे यावेळी स्मृती इराणी यांनी विद्यार्थी वर्गाशी मल्याळम, बंगाली, गुजराती आणि मराठीत संवाद साधला.

      एकेकाळी मनोरंजन मालिकेद्वारे भारताच्या घराघरात पोहचलेल्या स्मृती इराणी मोदी सरकार आणि भाजपमध्ये महत्वाच्या नेत्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

    RUSSIA-UKRAIN-INDIA: Students returning to India – Welcome in their own country! When Smriti Irani asked in four languages …

    Related posts

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनचा खरा चेहराही समोर

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, युद्धबंदी दरम्यान भारतीय हवाई दलाचे मोठे विधान