• Download App
    पळा पळा पळा कोण पुढे "पडतो??"; अर्थात दोन ससे आणि एका कासवाची शर्यत!!|Run Run Run Who Next "Fall ??"; Of course two rabbits and a turtle race !!

    पळा पळा पळा कोण पुढे “पडतो??”; अर्थात दोन ससे आणि एका कासवाची शर्यत!!

    “पळा पळा पळा कोण पुढे पळतो” हे 1990 च्या दशकात गाजलेले नाटक आता देशाच्या राजकीय मंचावर किंचित वेगळ्या नावाने सादर होताना दिसते आहे, “पळा पळा पळा कोण पुढे पडतो?” हे या नाटकाचे बदललेले नाव आहे…!! यात फक्त “पळतो” ऐवजी “पडतो” असा शब्द प्रयोग वापरला पाहिजे.Run Run Run Who Next “Fall ??”; Of course two rabbits and a turtle race !!

    कारण या पाळणाऱ्यांची अर्ध्याच शर्यतीत नक्की दमछाक होऊन ते पडण्याची शक्यता जास्त आहे. ही नाटकीय कहाणी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायला निघालेल्या दोन नेत्यांची. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांची…!!



    राजकीय योगायोगाने हे दोन्ही नेते सध्या गोव्यात आहेत. गोव्याचा राजकीय ज्योतिषातला नेमका “योग” काय आहे?, हे समजायला मार्ग नाही पण देशात पुढे काही “मोठे” घडणार असले, तर त्याची पाळेमुळे कुठेतरी गोव्यातल्या घटनेमध्ये घडलेली दिसतात.

    गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित करण्याची बैठक भाजपने गोव्यातच घेतली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी नाराज होऊन बाहेर पडलेले संपूर्ण देशाने पाहिले!! अर्थात या घटनेला काही वर्षे उलटून गेली आहेत. गोव्याच्या मांडवीतून बरेच पाणी वाहून गेले आहे.

    आता दुसऱ्या राजकीय योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातले पंतप्रधानपदाचे दोन स्वयंघोषित उमेदवारही गोव्यात आहेत. दोघांनाही मोदींना हरवायचे आहे, पण प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांच्या विरोधात लढत असल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबळ होण्यामागे काँग्रेसच कारणीभूत आहे, असा थेट आरोप करून ममता बॅनर्जी यांनी एक प्रकारे गांधी परिवाराला टोचून घेतले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवात ममता बॅनर्जी आडकाठी घालत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी हे एकमेकांवर वार करत आहेत.

    लहानपणी अनेकांनी ससा – कासवाची गोष्ट ऐकली आहे. त्यात एक ससा होता. एक कासव होते. पण भारताच्या राजकीय पटलावर सध्या दोन ससे एका कासवाला हरवण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले आहेत. अर्थात कासवाला हरवण्याची दोन सशांची महत्त्वाकांक्षा गैर मानण्याचा येथे प्रश्न नाही. तो त्यांना भारतीय लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.

    ससा आणि कासव यांच्यातली शर्यत कोण जिंकले हे गोष्टीतून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण दोन ससे आणि एक कासव यांच्या शर्यतीत मात्र नेमके कोण जिंकेल हे समजण्यासाठी आपल्याला 2024 च्या निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

    ससा आणि कासवाच्या गोष्टीत ससा अर्ध्याच शर्यतीपर्यंत जोरात पळून नंतर झोपला असे सांगितले आहे. हे आपल्याला पटलेही आहे. पण भारताच्या राजकीय पटावरच्या गोष्टीत मात्र हे दोन ससे कासवाला हरवण्याच्या बेतात एकमेकांचे पाय ओढणाऱ्या कोळ्यांच्या रुपात दिसत आहेत.

    शिवाय ससा आणि कासव यांची नेमकी वैशिष्ट्ये काय? ससा कायम भित्रा असतो. कासव मंदगती असते. पण सगळ्यात महत्वाचा फरक सशाचे आयुष्य आणि कासवाचे आयुष्य यामध्ये आहे. ससा अल्पायुषी आहे, तर कासव दीर्घायुषी आहे. आणि इथेच भारताच्या राजकीय पटलावर घडत असलेल्या गोष्टीची “खरी मेख” आहे. पळा पळा पळा कोण पुढे “पळतो?” या ऐवजी इथे कोण पुढे “पडतो?” हा शब्दप्रयोग वापरला आहे तो सशांच्या दमणूकीला गृहीत धरून केला आहे.

    सध्या हे दोन ससे कासवाचा पराभव करण्यासाठी इतके जोरात धावत आहेत की शेवटपर्यंत पळू शकण्याऐवजी ते मध्येच पडण्याची दाट शक्यता वाटते आणि इथेच कासव शर्यत जिंकण्याची शक्यता आहे…!! रेस लंबी है और पिक्चर तो अभी “बहुत” बाकी है…, मित्रों…!!

    Run Run Run Who Next “Fall ??”; Of course two rabbits and a turtle race !!

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!