जगात सर्वात बुटके कोण, सर्वात उंच कोण, सर्वात ताकदवाद कोण अशा गोष्टी जाणून घेणे मजेदार असते. भारतीय स्त्रियांची सरासरी उंची साडेपाच फूट सुद्धा नाही. अशावेळी जगातली सर्वात उंच स्त्री बनण्याचा मान तुर्कस्थानातील रुमैसा गेल्गी या स्त्रिला मिळाला आहे. बाप रे. आहे तरी ती किती उंच? Rumeysa Gelgi from Turkey becomes the tallest living woman in the world. Ms Gelgi, 24, broke the Guinness World Records for the second time.
वृत्तसंस्था
इस्तांबूल : तुर्कस्थानातील रुमैसा गेल्गी या तरुणीची उंची आहे तब्बल 215.16 सेंटिमीटर म्हणजेच 7 फुट 0.7 इंच. या उंचीने रुमैसाला जगातील सर्वात उंच स्त्रिचा किताब मिळवून दिला आहे. उंचीचा विश्वविक्रम तिने नोंदवला आहे.
विशेष म्हणजे रुमैसाने दुसऱ्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. सन 2014 मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी ती जगातली सर्वात उंच तरुणी ठरली होती. अर्थात उंचीत होणारी वाढ ही एका आजारामुळे आहे. रुमैसा वीव्हर सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. रुमैसा गेल्या कित्येक दिवसांपासून बहुतेकवेळा व्हीलचेअर वापरते. वॉकरचा वापर करुन ती थोडा वेळा चालू शकते. वीव्हर सिंड्रोम हे एक दुर्मिळ अनुवांशिक उत्परिवर्तन आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, रुमैसा गेलगी सांगते की, तिच्या माहितीप्रमाणे तुर्कीमध्ये या आजाराची ही पहिलीच घटना आहे. माझा जन्म काही गंभीर शारीरिक आजारांसह झाला आहे.
भारतीय सैन्य अधिकाऱ्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! सर्वात वेगवान सोलो सायकलिंग
याच व्हिडीओमध्ये रुमैसा सांगते की, बालपणात तिला खूपदा भीती घालण्यात आली. पण तिला तिच्या कुटुंबाकडून खूप पाठिंबाही मिळाला आहे. लोकांना तिच्याबद्दल खूप कुतूहल असायचे. रस्त्यावरून जाणारे बहुतेक अनोळखी लोक तिच्याशी सहानुभूतीने वागत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने कॅप्शनमध्ये तिचा हवाला देऊन पोस्ट शेअर केली, “वेगळे असणे इतके वाईट नाही. यामुळे तुम्ही अशा गोष्टी साध्य करू शकता ज्याची तुम्ही आधी कल्पना केली नव्हती.” या व्हिडीओला जगभरातून लक्षावधी लोकांनी प्रतिसाद दिला. नेटिझन्सनी रुमैसाचे कौतुक करत तिच्या भावी आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे जगातला सर्वात उंच पुरुष देखील तुर्कस्थान याच देशातला आहे. त्याचे नाव सुलतान कोसेन असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार त्याची उंची फक्त 8 फुट आहे. कोसेनची उंची ब्रेन ट्यूमरमुळे वाढली. अशा अतिउंच लोकांना दैनंदिन जीवनात खूप अडचणींचा सामना करावा लागतो. सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय त्यांना अनेकदा साध्या गोष्टी करणेही अशक्य बनते. त्यामुळे जगात अनोख्या असणाऱ्या या व्यक्ती काही अंशी परावलंबी असतात.
Rumeysa Gelgi from Turkey becomes the tallest living woman in the world. Ms Gelgi, 24, broke the Guinness World Records for the second time.
महत्त्वाच्या बातम्या
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर 956, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले 4500 रुपये
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन