RSS Magazine Panchjanya : अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनला ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे संबोधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित ‘पाचजन्य’ साप्ताहिक मासिकाने म्हटले की, कंपनीने अनुकूल सरकारी धोरणांसाठी कोट्यवधी रुपये लाच म्हणून दिले आहेत. पांचजन्यच्या ताज्या आवृत्तीत अमेझॉनच्या व्यवसाय पद्धतीची समीक्षा करत जोरदार टीका करण्यात आली आहे. RSS Magazine Panchjanya cover story says E Commorse Amazon is East India Company 2 point 0, Highlight Positive Impact On Small Businesses
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनला ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे संबोधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित ‘पाचजन्य’ साप्ताहिक मासिकाने म्हटले की, कंपनीने अनुकूल सरकारी धोरणांसाठी कोट्यवधी रुपये लाच म्हणून दिले आहेत. पांचजन्यच्या ताज्या आवृत्तीत अमेझॉनच्या व्यवसाय पद्धतीची समीक्षा करत जोरदार टीका करण्यात आली आहे.
‘पांचजन्य’च्या आगामी 3 ऑक्टोबरच्या आवृत्तीत, अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर टीका करणारी कव्हर स्टोरी आहे.
पांचजन्यमध्ये हा लेख ‘ईस्ट इंडिया कंपनी 2.0’ या नावाने लिहिला आहे. ‘ईस्ट इंडिया कंपनीने 18व्या शतकात भारत काबीज करण्यासाठी जे केले, ते आज अमेझॉनच्या उपक्रमांमध्ये दिसून येते. अमेझॉनला भारतीय बाजारपेठेत आपली मक्तेदारी प्रस्थापित करायची आहे आणि तसे करण्यासाठी अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीने भारतीय नागरिकांचे आर्थिक, राजकीय आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते करण्यास सुरुवात केली आहे, असा दावाही मासिकाने केला आहे.
अमेझॉनच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर टीका करताना लेखात असे म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मवर असे चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज करत आहेत, जे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत. अमेझॉनने अनेक प्रॉक्सी संघटना स्थापन केल्याचा आरोप केला जातो आणि त्यांच्या बाजूने धोरणे असण्यासाठी कोट्यवधींची लाच दिल्याच्या बातम्या आहेत.”
अमेझॉन कायदेशीर लढाईत
अमेझॉन फ्युचर ग्रुपच्या अधिग्रहणावर कायदेशीर लढाईत अडकला आहे आणि भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) चौकशीला सामोरे जात आहे. अमेरिकन ई-कॉमर्स दिग्गज भारतातील त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी दिलेल्या कथित किकबॅकची चौकशी करत असल्याच्या बातम्याही आल्या आहेत आणि 2018-20 दरम्यान देशात उपस्थिती कायम ठेवण्यासाठी कायदेशीर खर्चात 8,546 कोटी रुपये किंवा 1.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स खर्च केले आहेत.
मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने अॅमेझॉनशी संबंधित कथित लाचप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणीही केली आहे.
तत्पूर्वी, आरएसएसशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स दिग्गजावर व्यापाऱ्यांच्या हितासाठी हानिकारक कायदे टाळून आणि अनैतिक व्यवसाय पद्धतींमध्ये गुंतल्याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अमेझॉनकडूनही उत्तर देण्यात आले आहे.
पांचजन्यला अमेझॉनचे उत्तर, कोरोना काळात तीन लाख विक्रेते जोडले
ई-कॉमर्स कंपनीने पांचजन्यने त्यांच्या लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अमेझॉनने सोमवारी एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, कोरोना महामारीदरम्यान तीन लाख नवीन विक्रेते त्यात सामील झाले. ज्यात 75,000 स्थानिक दुकाने आहेत. ही दुकाने 450 हून अधिक शहरांतील आहेत. अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीचे म्हणणे आहे की, या स्टोअर्समध्ये फर्निचर, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स, ब्यूटी प्रॉडक्ट्स, मोबाइल फोन, कपडे, मेडिकल प्रॉडक्ट्सचे व्यापारी समाविष्ट आहेत.
200 देशांमध्ये भारतीय उत्पादने विकण्यास निर्यातदारांना मदत : अमेझॉन
पांचजन्यच्या लेखाला प्रतिसाद म्हणून अमेझॉनचे वर्णन ईस्ट इंडिया कंपनी २.० केल्यावर प्रत्युत्तरात कंपनीने त्यांच्या निर्यात कार्यक्रमाचाही उल्लेख केला. कंपनीने सांगितले की, यामुळे 70,000 पेक्षा जास्त भारतीय निर्यातदारांना मदत झाली आहे. यामुळे महानगरांपासून लहान शहरे आणि वस्त्यांमधून जगातील 200 देशांमध्ये भारतीय उत्पादने विकण्यास मदत झाली. दुसरीकडे, अखिल भारतीय व्यापारी संघटनेने अमेझॉनविरुद्ध पांचजन्यच्या कव्हर स्टोरीचे समर्थन केले आहे.
RSS Magazine Panchjanya cover story says E Commorse Amazon is East India Company 2 point 0, Highlight Positive Impact On Small Businesses
महत्त्वाच्या बातम्या
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
- पंतप्रधान मोदी आज नवीन पिकांच्या ३५ जाती सादर करतील, शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतील
- INDIAN JOURNAL OF MEDICAL : शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
- Happy Birthday Lata Didi : मेरी आवाज ही पहचान है ! लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट ; 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं