- आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात .
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात सुरू झाला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जातोय.RR vs PBKS IPL 2021 at Wankhede stadium Mumbai
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबकडून कर्णधार के. एल. राहुल आणि विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
पंजाबने गेल्या वर्षीच युवा खेळाडू के. एल. राहुल याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे. तर राजस्थानने यंदा युवा संजू सॅमसनला संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आतापर्यंत 21 वेळा भिडले आहेत. या 21 सामन्यांपैकी 12 सामने राजस्थानने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये पंजाबने बाजी मारली आहे. रॉयल्सने आतापर्यंत एकदा आयपीएलचं विजेतेपद (2008) पटकावलं आहे.
आयपीएल स्पर्धेत यंदा राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या काही वर्षांइतका तुल्यबळ नाही. कर्णधार संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथसारखे धडाकेबाज फलंदाज असले तरीही पंजाब किंग्जच्या तगड्या फलंदाजीमुळे त्यांचेच पारडे या सामन्यात जड राहणार आहे.
IPL मध्ये हे दोन्ही संघ फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. आयपीएल 2020 मध्ये पंजाबचा संघ गुणतालिकेत 6 नंबरला बोता तर राजस्थानचा संघ अगदी तळाशी होता.यंदा हे संघ कशा प्रकारे मैदान गाजवणार हे लवकरच स्पष्ट होईल.
RR vs PBKS IPL 2021 at Wankhede stadium Mumbai