• Download App
    ROKHTHOK : ओ मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा...? इतिहास सांगतो मुख्यमंत्र्यांच्या (घोटाळेबाज) नातेवाईकांनी थेट घेतलीये मुख्यमंत्र्यांची विकेट ... काय होती बाळासाहेबांची भूमिका?ROKHTHOK: O Mannu, what will happen to you now ...? Biwi ka bhai ek taraf ....  History says Cms (scammers) relatives took the wicket of the chief minister directly ...

    ROKHTHOK : तेरा हुआ अब मेरा क्या होगा…? इतिहास सांगतो मुख्यमंत्र्यांच्या (घोटाळेबाज) नातेवाईकांनी थेट घेतलीये मुख्यमंत्र्यांची विकेट … काय होती बाळासाहेबांची भूमिका?

    महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस  या तीन पक्षांचे, ठाकरे पवार सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण कायमच धगधगतं राहिलं आहे.


    विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सळो की पळो करुन सोडलं आहे.


    दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची धाड पडल्याने आता पुढे काय होणार ? ह्याकडे सर्वच लक्ष देऊन आहेत . ROKHTHOK: O Mannu, what will happen to you now …? Biwi ka bhai ek taraf ….  History says Cms (scammers) relatives took the wicket of the chief minister directly …


    माधवी अग्रवाल

    औरंगाबाद : ठाकरे पवार सरकार सत्तेत आले अन् सगळीकडे आनंदी आनंद सुरू झाला …कुठे मंत्र्यामुळे पोरीची आत्महत्या (संजय राठोड)…कुठे 100 कोटी वसुली (अनिल देशमुख)…आता दहशतवादी दाऊद सोबत संबंध असणारे (नवाब  मलिक ) …या सर्वांवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री अन् शिवसेना प्रमुख मात्र गप्प(च) आहेत …फार मोठा फरक आहे ‘ त्या ‘ शिवसेना प्रमुख आणि ‘ ह्या ‘ शिवसेना प्रमुखांमध्ये ….ROKHTHOK: O Mannu, what will happen to you now …? Biwi ka bhai ek taraf ….  History says Cms (scammers) relatives took the wicket of the chief minister directly ….

    असो तर मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर इडीची कारवाई झाली त्यांचे 11फ्लॅट्स जप्त करण्यात आले …सरी खुदाई एक तरफ अन् बिविका भाई एक तरफ अशी म्हण प्रसिद्ध आहे ..या म्हणी प्रमाणे आता उद्धव ठाकरे मेहुण्याची बाजू घेणार की महाराष्ट्राचे प्रमुख म्हणजेच राजधर्म पाळणार ह्यातूनच जनतेला काय तोसंदेश जाईल .मात्र अद्याप तरी यावर मुख्यमंत्री अन् शिवसेनाप्रमुख गप्पच आहेत …

    आता पाहूया अशाच एका प्रसंगात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका काय होती ?

    तर तेव्हा मुख्यमंत्री होते  मनोहर जोशी …..

    मनोहर जोशी हे त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यामुळे चांगलेत अडचणीत आले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 1998 मध्ये त्यांनी पुण्यातील शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलून ते जावई गिरीश व्यास यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचं स्पष्ट झालं. जिथं त्यांनी दहा मजल्यांची इमारत बांधली.

    हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जोशींवर ताशेरे ओढले. जोशींसारख्या उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यानं फक्त जावयाच्या फायद्यासाठी एखाद्या शाळेच्या जागेचं आरक्षण बदलणं संतापजन असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले होते.

    या प्रकरणात  बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना त्यांच्या जागी मुख्यमंत्री केलं होतं.

    हे एक उदाहरण होतं…आतापर्यंत अनेक नेते, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या नातेवाईकांमुळे अडचणीत आले आहेत. त्यातल्या काही जणांना त्यांची पदंसुद्धा गमवावी लागली होती.
    आपण फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची याविषयी चर्चा करू या…

    विलासराव देशमुख

    2008 साली मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हल्ला झालेल्या भागाच्या दौऱ्यावर गेले.

    त्यावेळी त्यांच्याबरोबर 2 गैरसरकारी व्यक्ती होत्या. एक म्हणजे त्यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख, दुसरे म्हणजे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. पण याबाबतचं वृत्त जेव्हा बाहेर आलं तेव्हा मोठा गदारोळ झाला.

    या हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना त्यांचं पद गमवावं लागलं. त्याला इतरही कारणं होती. पण मुलाला बरोबर घेऊन केलेला हा दौरासुद्धा त्यातलं एक महत्त्वाचं कारण ठरला होता.

    अशोक चव्हाण

    ‘ आदर्श ‘ जावई अशोक चव्हाण सासूबाईंमुळे अडचणीत आले होते .

    विलासराव देशमुख यांच्या नंतर काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर लगेचच 2009ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली. अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले.

    पण त्यानंतर लगेचच 2010 मध्ये  आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण अडचणीत आले.

    मुंबईतल्या प्रसिद्ध कुलाबा परिसरात  लष्करासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर रहिवासी इमारत उभारण्याची परवानगी दिल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला.

    या इमारतीमध्ये अशोक चव्हाण यांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मा यांच्या नावावर दोन फ्लॅट असल्याचं उघड झालं होतं. सोसायटीच्या फाईल्स क्लिअर करण्याच्या बदल्यात अशोक चव्हाण यांनी आदर्शमध्ये 3 बेनामी फ्लॅट मिळवल्याचा आरोप झाला होता.

    मीडियामध्ये हे प्रकरण खूप गाजल्यानंतर अशोक चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्याशी संबंधीत तब्बल 11 फ्लॅट ईडीनं जप्त केले आहेत.

    ईडीच्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 रहिवासी फ्लॅट्सचा समावेश आहे. निलांबरी प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे असून, याचे मालक श्रीधर माधव पाटणकर हे आहेत.

    शिवाजीराव निलंगेकर

    महाराष्ट्राच्या इतिहासात 1986 मध्ये माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना त्यांच्या मुलीला वैद्यकीय परीक्षेत गुण वाढवून देण्यातून झालेल्या वादामुळे राजीनामा द्यावा लागला होता.

    वरील सर्व उदाहरण पाहता आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हाच नियम इथे लागू होणार का? बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? असा सवाल सर्वांना पडला आहे … त्याचं उत्तर अजून मुख्यमंत्र्यांच्या मौनात आहे …

    ROKHTHOK: O Mannu, what will happen to you now …? Biwi ka bhai ek taraf ….  History says Cms (scammers) relatives took the wicket of the chief minister directly …

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य