डॉक्टर पती-पत्नीचे हातपाय बांधून सुमारे ७० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. लोणावळ्यातील उच्चभ्रु अशा प्रधान पार्कमध्ये शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी डॉक्टर पती-पत्नीला अर्धा तास ओलिस ठेवले होते. Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor’s hands and feet tied
प्रतिनिधी
पुणे : डॉक्टर पती-पत्नीचे हातपाय बांधून सुमारे ७० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. लोणावळ्यातील उच्चभ्रु अशा प्रधान पार्कमध्ये शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी डॉक्टर पती-पत्नीला अर्धा तास ओलिस ठेवले होते.
लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला.
पहाटेच्या सुमारास डॉ खंडेलवाल यांच्या पहिल्या मजल्यावरील घराची खिडकी उघडून सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रासह आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर डॉ खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांचे हात-पाय दोरीने बांधले. घरातील सर्व रोख रक्कम आणि सोने असा ऐवज त्यांनी लुटून नेला. सुमारे अर्धा तास दरोडेखोर त्यांच्या घरात होते.
50 लाख रुपये रोख आणि 16 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने असा एकूण 66 लाख 77 हजाराचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर हे सहा दरोडेखोर गच्चीवरुन चादर बांधत उतरुन पसार झाले. दरोडेखोर हे रस्सीने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor’s hands and feet tied
महत्त्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली गैरव्यवहाराची चौकशी हवी – प्रियंका
- आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; शोधमोहीम सुरू राहणार
- दहावी-बारावीच्या निकालावर शिक्षकांचा बहिष्कार, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने संतापाची लाट
- लोकसभा जिंकण्यासाठी देशात सर्वाधिक खर्च केला तो शशी थरुर यांनी…
- Corona Vaccination : कोविन अॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे बंधन नाही , आता केंद्रावरच थेट लस ;आरोग्य मंत्रालयाची माहिती
- हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम ; राज्यात ८० कोटी रुपयांचा दंड वसूल