विशेष प्रतिनिधी
बुलेटवर मॉडीफाई सायलेन्सर लावणाऱ्यांवर कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही कारवाई सुरु झाली आहे डोंबिवली पूर्व भागातील म्हसेाबा चौकात पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मॉडीफाई सायलेन्सरवर रोलर फिरविण्यात आला. ज्या गॅरेज धारकांनी हे सायलेन्सर लावले. त्यांच्या विरोधातही कारवाई सुरु करण्यात आली आहे. गॅरेज अनधिकृत असेल तर महापालिकेकडून त्या गॅरेजच्या विरोधात कारवाई करण्याचे सूचना पोलिसांनी महापालिकेस दिल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
– डोंबवलीत मॉडीफाई सायलेन्सरवर कारवाई
– 103 सायलेन्सरवर रोड रोलर फिरविला
– सायलेन्सर बसविणारे आता गोत्यात
– गॅरेजवाल्यावर कारवाईचा बेत
– बुलेटवर मॉडीफाई सायलेन्सरने ध्वनिप्रदूषण
– ज्येष्ठ, लहान मुलांना आवाज सहन होत नाही