विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ( Reliance Industries Limited- RIL) 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (RIL AGM 2021) आज गुरुवारी पार पडणार आहे. यावेळी RIL उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी काही महत्वपूर्ण घोषणा करण्याची चर्चा आहे .रिलायन्स जिओच्या सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉंचबाबत या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. रिलायन्सकडून AGM च्या व्यासपीठावरून हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. RIL AGM 2021 : Indias cheapest 5G smartphone will be lauched by reliance today
Reliance Jio आणि Google कडून स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे आज हा फोन लाँच झाल्यास तो देशातील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन ठरेल. सध्याच्या घडीला पोको M3 प्रो 5जी हा भारतामधील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 13999 रुपये इतकी आहे.
काय असेल किंमत ?
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओच्या नव्या 5G स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपये इतकी असू शकते. आगामी दोन वर्षात Reliance Jio कडून 150 ते 200 कोटी स्मार्टफोन विकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या स्मार्टफोनवरुन रिलायन्स जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड नेटवर्क प्लॅन वापरता येतील.
मुंबई-पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात-
रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.