कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदारअतुल भातखळकर यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. Republican CEO arrested without documents
बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट टीआरपी रॅकेटचा पदार्फाश केल्याचा दावा केला होता.
Republican CEO arrested without documents
पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचं रिपब्लिक टीव्हीकडून सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावर भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचसोबत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.