विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR च्या मुद्द्यावर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत भाजप हरल्याची यादी वाचून दाखविली.
ज्या अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे संघटनात्मक बदल करून संघटनेला निवडणुका जिंकण्याचा मंत्र आणि तंत्र दिला, त्या अमित शहा यांनी भाजप हरल्याची यादी लोकसभेत वाचून दाखविल्याने त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
SIR वर चर्चा करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मोदी सरकार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दोन्ही घटकांवर आरोपांच्या जोरदार फैरी चालविल्या. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्द्यांना अमित शाह यांनी लोकसभेत आज प्रत्युत्तर दिले.
– अमित शाह म्हणाले :
– काँग्रेस किंवा विरोधक ज्यावेळी हरतात तेव्हा निवडणूक आयोग वाईट असतो आणि मतदार याद्या खराब असतात ते निवडणुका जिंकले की निवडणूक आयोग आणि मतदार याद्या हे दोन्ही चांगले असतात. हा काँग्रेस आणि विरोधकांचा दुटप्पी राजकीय व्यवहार आहे.
– मतदार भाजपला नाकारत नाहीत म्हणून काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांच्या पोटात दुखते. केंद्रात आणि राज्यांमध्ये वारंवार भाजपची सरकारे निवडून येतात हे खरे, पण 2014 नंतर भाजप निवडणूक आज हरला नाही असे अजिबात नाही. 2018 मध्ये भाजप छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या तीन राज्यांमधली निवडणूक हरला. तेलंगणा तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल इथल्या निवडणुका सुद्धा भाजप जिंकू शकला नाही, पण म्हणून आम्ही निवडणूक आयोगावर किंवा मतदार याद्यांवर आमच्या पराभवाचे खापर फोडले नाही.
– काँग्रेसवाले किंवा बाकीचे विरोधक निवडणुका जिंकले, की नवे कपडे घालून लगेच शपथ घेतात, पण निवडणुका हरले, की निवडणूक आयोग आणि मतदार यादीवर बोट दाखवायला मोकळे होतात.
– मतदार यादींचे शुद्धीकरण करण्यासाठी तर SIR चा प्रयोग निवडणूक आयोगाने केला, पण त्याला सुद्धा काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी विरोध चालविला. कारण त्यांना घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढायचे नाही. आपली मतपेढी संपुष्टात येण्याची त्यांना भीती वाटते.
Replying to Rahul Gandhi, Amit Shah read out the list of BJP losers in the Lok Sabha!!
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन
- वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!
- राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
- निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा