• Download App
    यशासाठीचे पंतसूत्रे लक्षात ठेवा Remember the key to success

    लाईफ स्किल्स : यशासाठीचे पंतसूत्रे लक्षात ठेवा

    आज प्रत्येकाला य़शस्वी व्हायचे आहे. आपण ज्या क्षेत्रात काम रतो त्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काही बाबी नित्यनेमाने कराव्या लागतात. त्याची सुरुवात स्वतःचे क्षेत्र निवडण्यापासूनच खऱ्या अर्थाने होत असते.Remember the key to success

    उत्तम करिअर निवडणे, त्यासाठी जीवापाड मेहनत घेणे, करिअरची सुरुवात झोकून देऊन करणे, पायरी पायरी चढत सर्वोच्च स्थान मिळवणे यालाच यश मानले जाते. यश मिळवल्यावर ते टिकवून ठेवणे हा देखील आजच्या जीवनातला करिअरविषयक महत्वाचा टप्पा आहे.

    करिअर निवडण्याच्या टप्प्याला विद्यार्थ्याच्या बुद्धीचे पैलू, त्याचा मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक कल महत्त्वाचा असतो. अनुभवी तज्ज्ञांचे त्यासाठी मिळणारे मार्गदर्शनही महत्त्वाचे असते. मात्र, करिअर निवडल्यावर समोर येणाऱ्या प्रत्येक टप्प्यातून पुढे जाताना बौद्धिक, व्यावहारिक चातुर्य, कार्यक्षमता, सातत्य, नेतृत्वगुण, आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल्स अशा अनेक गोष्टींची गरज भासते.

    यशस्वी कारकिर्दीतील हे टप्पे ओलांडताना, त्यातील यशापयश पचवत पुढे जाताना आणि मिळालेल्या यशाचा आनंद घेताना एका गोष्टीची नितांत गरज असते, ती म्हणजे उत्तम आरोग्य राखण्याची. या गोष्टीचा यश काबीज करताना विसर पडतो. मिळालेल्या प्रत्येक यशाबरोबर प्रकृतीची एकेक तक्रार डोके वर काढू लागते आणि यश उपभोगायच्या काळात शरीर विविध आजारांचे आजार होऊन बसते. त्यामुळे उत्तम आणि भक्कम आरोग्य हा कोणत्याही यशस्वी करिअरचा पाया ठरतो.

    साहजिकच करिअर कोणतेही निवडा, पण त्यात यश मिळवायचे असेल तर त्याकरिता आरोग्याचे अचल अधिष्ठान आवश्यक ठरते. यशासाठी पाच सूत्रांचे पालन करायला हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम, योग्य काळ विश्रांती, व्यसनांपासून दूर राहणे, मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे. यशस्वी जीवनासाठी हे पंचसूत्र कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

    Remember the key to success

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…