विशेष प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल वरचे व्हॅट कमी कर, अशी मागणी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.Reduce, reduce; Reduce fuel prices
सरकारने मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे खासदार रक्षा खडसे जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
- कमी करा,कमी करा; इंधनाचे दर कमी करा
- महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल वरचे व्हॅट कमी करा
- केंद्राने इंधन दरात कपात केली, आता तुमची पाळी
- कर्नाटक, मध्यप्रदेश, गोव्यात पेट्रोल स्वस्त
- इंधन कपात केलेल्या राज्यांचा आदर्श घ्या