• Download App
    ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट, चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशाराRed Alert in Thane, Palghar, Raigadh

    ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट, चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – ‘गुलाब’ चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत असून सोमवारी मध्यरात्री ते ओडिशा व आंधप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार असून काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Red Alert in Thane, Palghar, Raigadh

    ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मंगळवारी (ता.२८) पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे; तर मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



    गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (ता. २७) मराठवाडा आणि विदर्भात, मंगळवारी (ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या दरम्यान वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याचा इशारादेखील हवामान विभागाने दिला आहे.

    Red Alert in Thane, Palghar, Raigadh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…