जर शेतकरी आंदोलनाच्या आडून भारताचे तुकडे करण्याची इच्छा धरणाऱ्या ‘तुकडे-तुकडे ‘ लोकांनी मागून आंदोलनाच्या खांद्यावरून गोळी चालवली, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, अशा इशारा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : जर शेतकरी आंदोलनाच्या आडून भारताचे तुकडे करण्याची इच्छा धरणाऱ्या ‘तुकडे-तुकडे’ लोकांनी मागून आंदोलनाच्या खांद्यावरून गोळी चालवली, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, अशा इशारा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे.
Ravi Shankar Prasad warns of stern action if Tukde Tukde Gang
केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली बोर्डरवर गेल्या १८ दिवसांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, ‘आपले पीक भारतात कुठेही विकण्याची शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कोणीही त्यांना रोखणार नाही. तुमच्या पिकावर वेगळा बाजाराचा कर लागणार नाही. या वर्षी भारत सरकारने एमएसपीअंतर्गत ६० हजार कोटींची धानखरेदी केली आहे. यात ६० टक्के धान हे एकट्या पंजाबमधून खरेदी करण्यात आले आहे.
Ravi Shankar Prasad warns of stern action if Tukde Tukde Gang
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान दिले जात आहे. शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशाची सुरक्षा कमकुवत केली जात आहे आणि हे स्वीकारण्याजोगे नाही.