• Download App
    हाथरस प्रकरणात दंगे भडकवणारा रऊफ शरीफ केरळ पोलिसांच्या ताब्यात | The Focus India

    हाथरस प्रकरणात दंगे भडकवणारा रऊफ शरीफ केरळ पोलिसांच्या ताब्यात

    • देशातून पळून जायच्या प्रयत्नात तिरूअनंतरपूरम विमानतळावर अटक

    वृत्तसंस्था

    तिरूअनंतपूरम : मनी लॉड्रिंग प्रकरण आणि हाथरस प्रकरणात पोलिसांना हवा असलेला पीएफआयचा महासचिव रऊफ शरीफ केरळ पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तो देशातून पळून जायच्या तयारीत असताना तिरूअनंतपूर विमानतळावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. rauf sharif arrested by kerala police

    रऊफ शरीफ याच्या बँक खात्यात काही दिवसांपूर्वी २ कोटी रूपये आढळले होते. ते नेमके कोठे खर्च झाले, हाथरस प्रकरणानंतर काही ठिकाणी दंगली घडविण्यासाठी यातील रक्कम खर्च झाली का, यांचा उत्तर प्रदेश पोलिस तपास करत आहेत. तसेच या दोन कोटी रूपयांचा नेमका सोर्स ईडी तपासत आहे.



    रऊफच्या विरोधात मनी लॉड्रिंग अर्थात पैशाच्या अफरातफरीची केस चालू आहे. ईडी त्या प्रकरणाचाही तपास करत आहे. ईडी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या विरोधात अनेकदा तपासाच्या आणि चौकशीच्या नोटिसा जारी केल्या परंतु, त्यापासून दूर पळत होता. त्याने अनेकदा राहण्याची ठिकाणे बदलल्याचेही लक्षात आले. आजही दुपारी तिरूअनंतपूरम विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ईडीच्या अलर्टनुसार त्याला केरळ पोलिसांनी रोखले.

    rauf sharif arrested by kerala police

    रऊफकडून ओमानची काही कागदपत्रे, क्रेडिट कार्ड आणि अन्य कादगपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यापुढे त्याला ईडी आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपविण्यात येईल.

    Related posts

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते गेले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी घातले साकडे; महाराष्ट्राचे राजकारण 360° मध्ये फिरल्याचे चिन्ह दिसले!!

    पवारांनी दाखवली आपल्या पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट??