Tuesday, 6 May 2025
  • Download App
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम बहुल भागात सुरू करणार संघाच्या शाखा, चित्रकूट येथील अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीत निर्णय. Rashtriya Swayamsevak Sangh to launch in Muslim-majority areas

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम बहुल भागात सुरू करणार संघाच्या शाखा, चित्रकूट येथील अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीत निर्णय

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मुस्लीम बहुल भागांत संघाच्या शाखा सुरू करण्यावर भर देणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनेत काही बदल केले असून, खांदेपालट करण्याचा निर्णय चित्रकूट येथील बैठकीत घेण्यात आला. Rashtriya Swayamsevak Sangh to launch in Muslim-majority areas


    विशेष प्रतिनिधी

    चित्रकूट: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मुस्लीम बहुल भागांत संघाच्या शाखा सुरू करण्यावर भर देणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनेत काही बदल केले असून, खांदेपालट करण्याचा निर्णय चित्रकूट येथील बैठकीत घेण्यात आला.

    चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची बैठक झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या शिबिरात राजकीय विचारमंथनही केले. पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी तसेच आगामी काळात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भैय्याजी जोशी यांना संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे. अरुण कुमार यांना संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

    कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आता देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. याशिवाय केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहोचवण्यासाठी योजना, रणनीती तयार करण्यात आली आहे.

    पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करणारपश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी संघाने महत्वाचा राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकत्तामध्ये, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून, तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचे काम सिलीगुडीमधून हाताळले जाईल.

    Rashtriya Swayamsevak Sangh to launch in Muslim-majority areas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??