- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Rape case against NCP youth state president
१४ नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणी मागील सीटवर बसली असता त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज जवळ निर्मनुष्य ठिकाणी थांबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरू करायची असल्याने ती बायपास परिसरात खोली भाड्याने घेण्यासाठी गेली असता. त्याठिकाणी तिची बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी भेट झाली. त्यांनंतर तिचे शिक्षण किती झाले विचारून तुला मुंबईत नोकरी लावून देतो असे आमिष महेबूब शेख यांनी दाखवले. यानंतर तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही, असे म्हणून तिला कारमधून उतरून दिले.
घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार केली. याप्रकरणी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rape case against NCP youth state president
..तर फासावर जायला तयार; मेहबूब शेख यांनी फेटाळला आरोप
संबंधित महिलेला मी कधीही भेटलो नाही, दहा अकरा तारखेला मी मुंबईत होतो. तर १७ तारखेला मी माझ्या मूळ गावी असल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे. महिलांच्याप्रती मला प्रचंड आदर आहे. तसेच माझा याप्रकरणाशी कुठलाही संबंध असला तर मी फासावर जायला तयार आहे. मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घ्यायला तयार आहे, असे मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.