• Download App
    रणवीर, दीपिकाला अलिबागची भुरळ तब्बल ९० गुंठे जागा २२ कोटींना केली खरेदी Ranveer, Deepika The allure of Alibag

    रणवीर, दीपिकाला अलिबागची भुरळ तब्बल ९० गुंठे जागा २२ कोटींना केली खरेदी

    विशेष प्रतिनिधी

    रायगड : कोकणातील मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौन्दर्याची भुरळ कुणाला न पडावी तर नवल. सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एनए (NA) जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. Ranveer, Deepika The allure of Alibag

    त्या जागेच्या काही कागदोपत्री कामासाठी ते आज आलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. या जोडीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली. सिनेकलाकार उच्च राहणीमानासाठी सतत चर्चेत असतात. मुंबई मधील उच्चभ्रू सोसायटी असो वा सुट्ट्या घालविण्यासाठी त्यांनी घेतलेले रिसॉर्ट. मात्र, शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी हक्काचा निवास असावा, अशी इच्छा प्रत्येकाची असते.

    अलिबाग , मुरुड व अन्य पर्यटनस्थळी अनेक अभिनेते, राजकीय मंडळी यांचे फार्म हाऊस, घरे थाटली आहेत. आजकाल सर्व कलाकारांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत आहे. येथील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र निसर्ग सहवास मिळावा, यासाठी ते हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात . रणवीर आणि दीपिकाच्या जागेत दोन बंगले असून नारळ, सुपारीची बाग आहे.

    • पती-पत्नी अलिबाग दुय्यम निबंधक कार्यलयात आले
    •  दोघांना पाहण्यासाठी नागरिकांची उसळली गर्दी
    •  समुद्र किनारी राहण्यासाठी जमीन खरेदी केली
    •  दोन बंगले असून नारळ, सुपारीची बाग आहे

    Ranveer, Deepika The allure of Alibag

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??