• Download App
    'हनीट्रॅप'मध्ये अडकवून खंडणीची मागणी, तोतया पत्रकारासह चार जणांची टोळी जेरबंद Ransom demand by planned honeytrap , gang of four arrested

    ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून खंडणीची मागणी, तोतया पत्रकारासह चार जणांची टोळी जेरबंद

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शरीरसंबंधांचा व्हिडिओ काढून एका भाजी विक्रेत्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून खंडणी मागण्यात आल्याप्रकरणी तोतया पत्रकारासह चार जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. Ransom demand by planned honeytrap , gang of four arrested

    यातील एकाकडून सीबीआयचे बनावट ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपीने यूट्यूब न्यूज चॅनलच्या व संघटनेच्या नावाखाली ब्लॅकमेल केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिवप्रहार संघटनेचा अनिल जगन्नाथ बोटे (वय 34, रा. तुकाई टेकडी, हडपसर), महाराष्ट्राचा प्रहार न्यूजचा राहुल मच्छिंद्र हरपळे (वय 32 रा. फुरसुंगी), संतोष उर्फ शिवा उत्तम खरात (वय 26, रा. हडपसर), स्वप्नील विजय धोत्रे (वय 24, रा. कोंढवा), मारुती लहू निश्चित (वय 39, रा. शिरूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका भाजी विक्रेत्याने फिर्याद दिली आहे.

    स्वप्नील धोत्रे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. धोत्रे यांनी 10 सप्टेंबर रोजी त्यांना फोन करून एका पबमध्ये बोलावले होते.

    त्यावेळी हरपळे हा दोन मुलींना घेऊन कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये गेला. त्यांच्यासोबतच्या एका मुलीने फिर्यादी यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. संमतीने दोघेही लॉजवर गेले. त्यांच्यामध्ये शरीरसंबंध आला. दोन दिवसांनी आरोपींनी फिर्यादीच्या दुकानात जाऊन तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहोत असे सांगितले. पोलिसात तक्रार द्यायची नसेल तर पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. दुसऱ्या दिवशी बोटे याला समजावण्यासाठी हरपळे याच्या हडपसर येथील मेगा सेंटर मधील ऑफिसमध्ये गेले असता फिर्यादी यांना मारहाण करण्यात आली.

    आरोपी निचित याने सीबीआय अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवित बलात्काराचा गुन्हा दाखल करतो आणि तुला संघटनेची ताकद दाखवतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. घाबरलेल्या फिर्यादी यांनी धोत्रे फोन केल्यावर त्याने बोटे हा लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये गेल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी स्वतः पोलीस ठाण्यात गेले. त्याच्याकडून सर्व हकीकत समजल्यावर लोणी काळभोर पोलिसानी गुन्हा दाखल करून हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

    Ransom demand by planned honeytrap , gang of four arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??