संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.
नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार समोर आल्याने बजावण्यात आली नोटीस.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुक जवळ आली आहे . त्याआधीच शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष सुरू झाला आहे. किरीट सोमय्या विरूद्ध संजय राऊत असा सामना रंगलेला असताना आज मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे.RANE VS SHIVSENA: Rane vs Shiv Sena! Mumbai Municipal Corporation’s notice to Union Minister Narayan Rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू या ठिकाणी एक बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आल्याने मुंबई महापालिकेने ही नोटीस पाठवली आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात नारायण राणेंना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध नारायण राणे असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत.
मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक आज नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल, अशी नोटीस राणे यांना पाठवली आहे.
आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची याआधी तक्रार करूनही महापालिकेनं कारवाई केली नसल्याचं दौंडकर यांनी महापालिकेला कळवलं आहे. त्यानंतर महापालिकेनं ही नोटीस पाठवली.
बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
RANE VS SHIVSENA: Rane vs Shiv Sena! Mumbai Municipal Corporation’s notice to Union Minister Narayan Rane