• Download App
    गेहलोत सरकारच्या 3 मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची पिछाडी, जाणून घ्या पंचायत निवडणुकीत भाजपची कामगिरी! Rajasthan Panchayat Election Results Know Result and analysis

    Rajasthan Panchayat Election Results: गेहलोत सरकारच्या 3 मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची पिछाडी, जाणून घ्या पंचायत निवडणुकीत भाजपची कामगिरी!

    राजस्थानच्या सहा जिल्ह्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील गेहलोत सरकारच्या तीन मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले, तर दोन मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पक्षाला विजय मिळवून देण्यात यश आले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थानच्या सहा जिल्ह्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील गेहलोत सरकारच्या तीन मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले, तर दोन मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पक्षाला विजय मिळवून देण्यात यश आले आहे.

    निवडणूक निकालांच्या पुनरावलोकनात हे उघड झाले आहे की सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री राजेंद्र यादव, गृह राज्यमंत्री भजनलाल जाटव आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री सुभाष गर्ग यांच्या मतदारसंघातील पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. जयपूर जिल्ह्यात कृषिमंत्री लालचंद कटारिया, दौसा उद्योगमंत्री परसादिलाल मीना यांच्या मतदारसंघात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समिती सिकराईमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे, तर सिकंदरामध्ये अपक्ष निर्णायक आहेत.



    राज्य सरकारला पाठिंबा देणाऱ्या चार अपक्ष आमदारांमध्ये सिरोहीमधून संयम लोढा, डडूमधून बाबूलाल नगर, गंगापूरमधून रामकेश मीना आणि महवामधून ओमप्रकाश हुडला यांच्या मतदारसंघातही काँग्रेस पराभूत झाली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सतीश पुनिया यांच्या कार्यक्षेत्रातील आमेर आणि जलसू पंचायत समित्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

    जयपूर जिल्ह्यातील झोटवाडाचे आमदार आणि कृषिमंत्री लालचंद कटारिया यांच्या झोटवाडा आणि जोबनेर भागात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पायलट समर्थक आमदार वेदप्रकाश सोळंकी यांना चाकसूमधून, इंद्रराज गुर्जर यांना प्रत्येकी एका पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. गोपाल मीना यांना जमवारमगढमधून एका ठिकाणी बहुमत मिळाले आहे.

    असा आहे जिल्हा परिषदेचा निकाल : एकूण जागा 200

    काँग्रेस 99
    भाजप 90
    बसप 3
    अपक्ष 8

    पंचायत समित्यांमधील कामगिरी

    काँग्रेस 670
    भाजप 551
    अपक्ष 290
    आरएलपीए 40
    बसपने 11

    Rajasthan Panchayat Election Results Know Result and analysis

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…