• Download App
    Raj Kundra Porn Films case : वेडं बनून पेढा खाणं यालाच म्हणतात; शिल्पा शेट्टीला शर्लिनने सुनावलं Raj Kundra Porn Films case

    Raj Kundra Porn Films case : वेडं बनून पेढा खाणं यालाच म्हणतात; शिल्पा शेट्टीला शर्लिनने सुनावलं

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून, त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात शिल्पा शेट्टी नोंदवलेला जबाब असून, आपल्याला राज कुंद्राच्या व्यवसायाविषयीही माहिती नव्हती, असं शिल्पाने म्हटलं आहे. त्यावरून अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीला सुनावलं आहे.Raj Kundra Porn Films case

    पॉर्न चित्रपट बनवून ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करणाऱ्या एका रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणाचे धागेदोर थेट उद्योगपती राज कुंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राज कुंद्रा सूत्रधार असून तसे पुरावे असल्याचं पोलिसांनी अटकेनंतर स्पष्ट केलं होतं.

    राज कुंद्राच्या अटकेनंतर पोलिसांनी शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला होता. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर शिल्पाचं म्हणणं समोर आलं आहे. त्यावरून आता शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीला सुनावलं आहे.

    शर्लिन चोप्राने ट्विटरवर एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात तिने शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

    माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार दीदीचं (शिल्पा शेट्टी) असं म्हणणं आहे की, तिला तिच्या पतीदेवाच्या या व्यवसायाबद्दल कसलीही माहिती नव्हती. इतकंच नाही, तर दीदीचं असंही म्हणणं आहे की, तिच्या पतीदेवाच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या स्त्रोताबद्दलही माहिती नव्हती. आता ही गोष्ट किती खरी आहे, याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता. असो, पण वेडं बनून पेढा खाणं यालाच म्हणतात ना?

    Raj Kundra Porn Films case

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!