• Download App
    Rainfall forecast above average, signs of good rains in the state from 3 to 9 September

    सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 3 ते 9 सप्टेंबर राज्यात चांगल्या पावसाचे संकेत

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी 3 ते 9 सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत.  राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Rainfall forecast above average, signs of good rains in the state from 3 to 9 September

    ऑगस्ट महिन्यातील अपुर्‍या पावसाने तर चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता मॉन्सूनच्या उर्वरीत हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.



    तर विदर्भाचा बहुतांशी भाग दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला. 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, कोकणातील पालघरसह मुंबई उपनगरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजेच सरासरीच्या तुलनेत 260 टक्के अधिक पाऊस पडला आहे.

    पुढील दोन आठवड्यात पडणार्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (3 ते 9 सप्टेंबर) राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर दुसर्‍या आठवड्यात (10 ते 16 सप्टेंबर) कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भात चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

    Rainfall forecast above average, signs of good rains in the state from 3 to 9 September

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!