• Download App
    या रेल्वेत बसवणार कोरोना सेंसेटिव्ह कोच, हवेतच व्हायरसचा खात्मा करणार प्लाझ्मा एअर थेरपी । Railway Install Corona Sensitive Railway Coach In Bhopal Express Plasma Air Therapy Kill The Virus In The Air

    रेल्वेकडून कोरोना सेन्सेटिव्ह कोचची निर्मिती, हवेतच व्हायरसचा खात्मा करणार प्लाझ्मा एअर थेरपी

    Corona Sensitive Railway Coach : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी रेल्वेने विषाणूशी लढण्याची तयारी चालवली आहे. रेल्वे एक खास प्रकारचे कोरोना संवेदनशील कोच तयार करत आहे, ज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश होताच त्याचा खात्मा होईल. वास्तविक, या विशेष कोचमध्ये प्लाझ्मा एअर थेरपी वापरली जाणार आहे. ही माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. Railway Install Corona Sensitive Railway Coach In Bhopal Express Plasma Air Therapy Kill The Virus In The Air


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी रेल्वेने विषाणूशी लढण्याची तयारी चालवली आहे. रेल्वे एक खास प्रकारचे कोरोना संवेदनशील कोच तयार करत आहे, ज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश होताच त्याचा खात्मा होईल. वास्तविक, या विशेष कोचमध्ये प्लाझ्मा एअर थेरपी वापरली जाणार आहे. ही माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले की, हा विशेष कोचला प्रथम शान-ए-भोपाळ एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात येईल. जुलैपर्यंत रेल्वेला एक एसी श्रेणी कोच मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

    अशी आहे रेल्वेची योजना

    मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी रेल्वे सातत्याने उपाययोजना करत आहे. याचाच एक भाग म्हणून एलएचबी कोच कोरोना संवेदनशील करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे सांगितले जात आहे की, या विशेष कोचमध्ये प्लाझ्मा एअर थेरपी वापरली जाईल, ज्यामुळे कोरोना संक्रमणास कारणीभूत विषाणूचा काही सेकंदातच नाश होईल.

    स्पेशल कोचची वैशिष्ट्ये

    या कोचमध्ये दाराच्या हँडलवर तांब्याचा लेप असेल. त्याचबरोबर मानवी संपर्क कमीतकमी राहील यासाठी प्रयत्न केले जातील. कोचच्या आत टायटॅनियम डायऑक्साइडचा एक थर असेल, ज्यावर कोरोना टिकणार नाही. त्याचबरोबर शौचालयातील नळ, सोप डिस्पेन्सर इत्यादींना टचलेस केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार हे विशेष कोच एसी तसेच नॉन-एसी प्रकारातही तयार केले जातील.

    निशातपुरा कोच फॅक्टरीला जबाबदारीची शक्यता

    मिळालेल्या माहितीनुसार, निशातपुरा येथे असलेल्या कारखान्यात प्रॉडक्शन युनिटप्रमाणे काम सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत, काही एलएचबी कोचच्या देखभालीदरम्यान, त्यांना नवे कोरोना संवेदनशील बनविण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. यासाठी लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून आदेश अपेक्षित आहे.

    Railway Install Corona Sensitive Railway Coach In Bhopal Express Plasma Air Therapy Kill The Virus In The Air

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य