बजाज स्कूटर एकेकाळी देशकी ‘धडकन’ होती. ‘बुलंद भारत की, बुलंद तस्वीर…. हमारा बजाज’ हे वाक्य वाचताना आजही आपण तालासुरातच वाचतो.
पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.
२००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी
औंरंगाबाद :स्पष्टवक्ते, उद्योजक आणि बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचं शनिवारी (12 फेब्रवारी) दुपारी पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची धुरा सांभाळत बजाज समूह जगभरात नावारुपाला आणण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.औरंगाबादचा श्वास ..विश्वास ! औरंगाबाद विकासात अविस्मरणीय योगदान असणारी बजाज कंपनी . औरंगाबादच्या उद्योग जगताला गती देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुल बजाज .RAHUL BAJAJ: “Hamara Bajaj” Aurangabad’s breath .. Faith! Unforgettable contribution to the development of Aurangabad – a personality who gave impetus to the business world
बजाज ऑटो लिमिटेडचे पुण्यातील आकुर्डी, चाकण, औरंगाबाद जवळील वाळूज येथे बजाज बाइक्स आणि ऑटो तयार करण्याचा प्लांट आहे.
सर्वसामान्य भारतीयांच्या वाहनाचे स्वप्न पूर्ण करत तब्बल ५ दशके बजाज ऑटो समूहाचे नेतृत्व करणारे राहुल बजाज.
अनेक देशांमध्ये नावलौकिक मिळवूनही संभाजीनगर (औरंगाबाद) सारख्या शहरात मोठा उद्योग निर्माण करून संपूर्ण मराठवाड्याला उद्योग क्षेत्रात नवी ओळख मिळवून दिली.
मराठवाड्यातील आज असंख्य उद्योग बजाज कंपनीमुळे अस्तित्वात आले आहेत. संभाजीनगरला ‘ऑटो हब’ बनवण्यात बजाज समुहाचा मोलाचा वाटा आहे.
मुबलक नफ्यासाठी आज अनेक उद्योजक परदेशांमध्ये उद्योग सुरू करतात, मात्र बजाज यांनी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली.
कामगारांना सुरक्षित आणि पोषक वातावरणाबरोबर उत्तम सुविधा देण्यावर त्यांचा भर होता.
विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला आव्हान देत ‘बजाज ऑटो’ कंपनीला त्यांनी भारतातच नाही तर जगभरात पोहोचवले
राहुल बजाज यांच्या नंतर त्यांचे पुत्र राजीव बजाज यांनी डायरेक्टर पदाची सूत्रे सांभाळली. ३५ वर्षाच्या यशस्वी घौडदोडनंतर बजाज चेतकचे उत्पादन थांबवण्यात आले.
आज २० नंतर पल्सर, डिस्कवर, प्लॅटिना यासारख्या बाइक्सचे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात असून ग्राहकांचा याला मोठा प्रतिसाद मिळतोय. बजाज पल्सर, ऑटो, टेम्पो, मिनीबसचेही प्रोडक्ट बजाजकडून केले जाते.
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल येथील प्रेसीडेंसीमध्ये झाला होता. राहुल बजाज यांचं भारतातील यशस्वी उद्योगपतींच्या पंगतीत घेतलं जातं.
राहूल बजाज यांनी कॅथेड्रल अॅण्ड जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफेंस कॉलेजमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) पदवी घेतली. राहुल बजाज यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली होती. त्याचबरोबर हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीएचं शिक्षणही पूर्ण केलं होतं.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि दानशूर जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल बजाज यांनी १९६५ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी बजाज उद्योगाची सूत्रं हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालीच बजाज समूहाने यशाची शिखरं गाठली.
बजाज समूहाची सूत्रं त्यांच्या हाती असतानाच देशाने उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राहुल बजाज यांनी सरकारवर सुनावलं होतं आणि पुढाकार घेऊन उद्योजकांची भीती सरकारपर्यंत पोहोचवली होती.
त्यांच्याच नेतृत्वाखाली बजाज समूहाने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत जम बसवला. 1980 च्या दशकात बजाज दुचाकी स्कूटरचा अग्रगण्य निर्माता होता. बजाज समूहाच्या ‘चेतक’ स्कूटरला एवढी मागणी होती होती की, त्यासाठी 10 वर्षांचा वेटिंग-पीरियड होता. राहूल बजाज अनेक कंपन्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष देखील होते. त्याचबरोबर 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
राहुल बजाज यांनी उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर फ्रान्सकडून देण्यात येणारा ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.