अवकाशात अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा धोका आहे, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील (आयएसएस) संशोधकांनी काढला आहे. अंतराळ मोहिमांमध्ये किरणोत्सर्गामुळे अंतराळवीरांचे शारीरिक नुकसान किती होऊ शकते, हेही सांगण्यात आले आहे. सध्या अमेरिका, भारत व चीनसह अनेक देश चंद्रावर उतरण्याचे तसेच भविष्यात मंगळ व त्यापलीकडील मानवी अंतराळ मोहिमांवर अनेक देशांचे लक्ष आहे.Radiation hazards even astronauts in space!
मात्र एका संशोधनाद्वारे याला धक्का पोचण्याची शक्यता आहे. ‘आयएसएस’ मधून अवकाशात बाहेर जाणऱ्या अंतराळातील धोका कमी व्हावा आणि आगामी संशोधन मोहिमांमधील अंतराळातील किरणोत्सर्गाचा धोक्याचा अंदाज व्यक्त करण्याची यंत्रणा विकसित करण्यासाठी ‘आयएसएस’वरील अंतराळवीर सातत्याने अभ्यास करीत आहेत. ‘नेचर-सायंटिफिक रिपोर्ट’ या नियतकालिकांत एक लेख प्रसिद्ध झाला आहे.
पृथ्वीवरील किरणोत्सर्गाला प्रत्येक अंतराळवीरांचा ‘डीएनए’ कसा प्रतिसाद देते याच्या अभ्यासावरुन अंतराळ मोहिमेतील ‘डीएनए’च्या परिणामांचा अंदाज कसा करू शकतो, हे शास्त्रज्ञांनी लेखात शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये गुणसूत्र बदलाचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनाचा भाग म्हणून ४३ अंतराळवीरांचे अवकाश मोहिमांआधी व नंतर अशा दोन वेगवेगळ्या वेळी रक्त तपासण्यात आले. मोहिमेआधी घेतलेल्या रक्ताचे नमुने हे गॅमा किरणांच्या गॅमा किरणांच्या संपर्कात आणले गेले
अंतराळ मोहिमेनंतरचे नमुने हे अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर काही महिन्यांनी करण्यात आले. किरणोत्सर्गामुळे अंतराळवीरांच्या शरीराची किती हानी झाली आहे आणि त्याचे प्रमाण निश्चिआत करता येते का आम्हाला जाणून घ्यायचे होते. याशिवाय अंतराळवीर अवकाशात जाण्यापूर्वी अंतराळवीरांचे वय, लिंग यामुळे दिसणारा फरक यांचे निरीक्षण अंतराळवीर अवकाशात जाण्यापूर्वी करण्यायत आले, असे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले.