• Download App
    PUSHPA : पुष्पाने तोडले अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ; 300 कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा सामिल PUSHPA: Pushpa breaks many film records; 300 crore club joins cinema

    PUSHPA : पुष्पाने केले अनेक रेकॉर्ड ब्रेक ; ३०० कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा सामिल

    • पुष्पा या चित्रपटात  एका जंगलाची स्टोरी दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये चंदनाची तस्करी केली जाते. ज्याच्या विरोधात अल्लू अर्जुन लढतो. 

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘पुष्पा’ हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. 2021 च्या अखेरीस रिलीज झालेल्या या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये जबरदस्त कमाई केली आहे.PUSHPA: Pushpa breaks many film records; 300 crore club joins cinema

    ‘पुष्पा’च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाने भारतात पहिल्याच आठवड्यात सुमारे 166 कोटींची कमाई केली आहे आणि जर जगभरात बोलायचं झालं तर या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली आहे.

     

    या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी भाषेतही आपली ज्योत पसरवली आहे. ज्याची चाहत्यांमध्ये क्रेझ कमी होण्याचं नावच घेत नाही आहे. एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाने हिंदीमध्ये सुमारे 56.69 कोटींची कमाई केली आहे आणि हा आकडा आता 75 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

    तिसर्‍या आठवड्याच्या दुस-या दिवशी चित्रपटाने 6.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यावर तरण आदर्श यांनी ट्विट केलं आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ‘पुष्पा’ सनसनाटी आहे आणि या चित्रपटाने 16 व्या दिवशीही सर्वोत्तम कमाई केली आहे.

    त्याचबरोबर या चित्रपटाने हिंदीत एका दिवसात इतकी कमाई केली नव्हती. हा चित्रपट खूप हळूहळू हिट होत होता. पण नंतर या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ज्यामुळे अल्लू अर्जुन देखील खूप खुश आहे.

    PUSHPA: Pushpa breaks many film records; 300 crore club joins cinema

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार